श्रीगोंदा दि ०२:-अवैध धंद्यावाले जोमात मात्र पोलिस प्रशासन कोमात श्रीगोंदा तालुक्यातील ग्रामीण भागात अवैद्य रित्या हातभट्टी दारुची विक्री होत असुन याकडे पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.यामुळे अनेक गावातील तरुण पीढी सुध्दा दारुच्या आहारी जात आहे. तळीराम दिवसभर हातभट्टी दारू पिऊन गावभर फिरतात यामुळे येथून जाणाऱ्या येणार्या सर्वसामान्य लोकांना तळीरामांपासुन ञास होत आहे,दारुमुळे कित्येकांचे संसार देशोधडीला लागले आहे.माञ याकडे सर्वांचेच दुर्लक्ष होत आहे. तसेच नगर-दौंड रोडवरील अनेक गावांत अवैद्य हातभट्टी दारु विक्री होत आहे. यामुळे तळीरामांना तर चांगलेच दिवस आले आहे.
ज्या पोलिस बीट जमादाराच्या कार्यक्षेञात अवैध व्यवसाय चालू असतील त्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश असताना देखील लोणी, शिरसगाव, मढेवडगांव,काष्टी, ढोकराई, श्रीगोंदा फॅक्टरी इत्यादी गावांमध्ये “दिन दहाडे” अवैध हातभट्टी धंद्यांना उत आला असुन पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होत आहे. या भागात अवैध वाळूतस्करी,दारु,आदी “ईन्कमसोर्स”द्वारे दरमहा हजारो रुपयाची कमाई ठिकठिकाणी नियुक्त एजंटांमार्फत वसुल करण्यात येत आसल्याची चर्चा होत आहे.बीट जमादारांनी अवैध धंदेवाल्यांवर लक्ष ठेवण्यासाठी गावोगावी एजंट नेमुन दिले आहे,यामुळे परिसरात कुठे काय अवैध व्यवसाय चालू आहे हे तत्काळ त्या परिसराच्या बीट जमादाराला माहिती मिळते व आज कोण वरिष्ठ त्या भागात जाणार आहे हे तत्काळ त्या अवैध धंधेवाल्याला कळविले जाते.त्यामुळे अवैध धंद्यावाले सावध होतात व वरिष्ठांनाच्या हाती काही सापडत नाही.लोणी, शिरसगाव, मढेवडगांव,काष्टी, ढोकराई, श्रीगोंदा फॅक्टरी सह परिसरात चालणारे सर्व अवैध धंदे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन बंद करावेत व सर्वसामान्य जनतेला होणारा ञास कमी करावा व परिसरातील कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची दक्षता घ्यावी अशी भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
अशी केली जाते वाळू वाहतुक
रात्रीच्या सुमारास या परिसरात वाळुची वाहतुक केली जाते या वाळूची वाहतुक सुरु असताना पोलिसांवर लक्ष ठेवण्यासाठी काहिंची नेमनुक केलेली असते व ज्यांची नेमणुक वाळु तस्करी करणार्यांनी केलेली आहे.त्यांना पोलिसांची माहिती फोनद्वारे मिळत असते. त्यामुळे पोलिस प्रशासनापेक्षाही वाळुची वाहतुक करणारे अतिशय चपळ असल्याचे दिसुन येत आहे. ज्या वेळी बीट जमादार पोलिस ठाण्यात असेल तेव्हा लगेच वाळुचे टिप्पर वाळू टाकून मोकळे झालेले असते.त्यामुळे ते पोलिसांच्या हाती लागत नाही.
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे