अमरावती दि ०३ :- अमरावती येथे लाक्षणीय उपोषण महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा च्या माध्यमातून एकाच वेळी राज्यभर तीनशेपेक्षा जास्त तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयात लक्षणीय उपोषण करून काळ्या फिती व काळे मास लावून सर्वप्रथम संत संताजी जगनाडे महाराज माल्यार्पण करून प्रशासनाचा निषेध करून निवेदन देण्यात आले.अमरावती शहरातसुद्धा ओबीसींच्या आरक्षणाकरिता एकदिवसीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर येथे लाक्षणीय उपोषण करण्यात आले प्रदेशाध्यक्ष मा. खा. रामदासजी तडस, महासचिव . डॉ. भूषणची कर्डिले, कोशाध्यक्ष गजानन शेलार, मंत्री विजयजी वडेट्टीवार, विदर्भाचे ओबीसी नेते माजी मंत्री. चंद्रशेखर बावनकुळे, विदर्भाचे प्रभारी बळवंतराव मोरघडे, युवा आघाडी अध्यक्ष मा. आ. संदीप क्षीरसागर, युवा आघाडी कार्याध्यक्ष अतुल वांदिले,विपीन पिसे, विभागीय अध्यक्ष संंजय हिंगासपुरे यांच्या मार्गदर्शनाने अमरावती येथे लाक्षणिक उपोषणाचे आयोजन करण्यात आले होते.या आयोजनाला तेली समाजासोबत इतर ओबीसी समाज बांधव सुद्धा उपस्थित होते अनेक ओबीसी संघटनांनी आजच्या लाक्षणिक उपोषणाला समर्थन दिले.उपोषणाला अनेक मान्यवरांनी व ओबीसी समाजबांधवांनी भेटी दिल्या याप्रसंगी.मंञी.अनिल बोंडे, आ.रवि राणा,आ.प्रतापदादा अडसड, आ.सुनिल देशमुख, नरेशचंन्द्र ठाकरे, प्रा.डॉ.संजय तिरथकर ,महापौर चेतन गावंडे, संतोष बंद्रे इत्यादी मान्यवरांनी ओबीसींवर होत असलेल्या अन्यायासंदर्भात सर्व पक्षांनी एकत्र येऊन हा लढा लढला पाहिजे अन्यथा येणाऱ्या निवडणुकांत ओबीसी नक्कीच या नेत्यांना जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही केंद्र सरकार व राज्य सरकारने आमच्या हक्काचं ओबीसी आरक्षण दिलेच पाहिजे आमच्या कोणत्याही राजकीय पक्षाला विरोध नाही आमचा विरोध आहे शासकीय यंत्रणेला तरी केंद्र व राज्य सरकारने सुप्रीम कोर्टाने मागितलेला इम्पिरियल डेटा तयार करून सुप्रीम कोर्टाला दिले पाहिजे आमचे स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसींचे राजकीय आरक्षण सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालात बाद झालेले आहे ते शक्यतर लवकर शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून प्रशासनाने पूर्ववत ठेवायला पाहिजे व केंद्र शासनाने जातनिहाय जनगणना केलीच पाहिजे महाराष्ट्र प्रांतिक तैली महासभेच्या माध्यमातून आज हे लाक्षणिक उपोषण करण्यात आले हे शांततेचे निवेदन होते भविष्यात आम्ही आमच्या ओबीसींच्या आरक्षणाकरिता सर्व ओबीसी समाज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही असे विभागीय अध्यक्ष संजय हिंगासपुरे यांनी उपोषणासंदर्भात सांगितले. अशा अनेक मागण्यांचे निवेदन तयार करून मा.जिल्हाधिकारी साहेब, अमरावती यांना देण्यात आले या प्रसंगी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा अमरावती विभाग.संजय हिंगासपुरे (विभागीय अध्यक्ष), अमोल आगाशे (प्रदेश युवा संघटक सचिव),राजेंद्र हजारे( विभागीय महासचिव ),.डॉ. संजय शिरभाते, (विदर्भ उपाध्यक्ष वर्हाड) सागर शिरभाते (युवा विभागीय अध्यक्ष), अवि देऊळकर (विभागीय संघटक ) विजय शिरभाते (शहर अध्यक्ष), बाळासाहेब लोहारे (जिल्हा अध्यक्ष), प्रा.स्वप्निल खेडकर (युवा शहर अध्यक्ष), किरणताई गुलवाडे( महिला जिल्हाध्यक्ष) ,
लिनाताई जावरे (महिला शहर अध्यक्ष), सविताताई भागवत (युवा महिला शहर अध्यक्ष) रूपाली शहाळे, चंद्रशेखर जावरे (जिल्हा महासचिव ), अविनाश जसवंते, कुशल बिजवे, वैभव बिजवे, अभिजीत खोरगडे, दीपक गिरुडकर ,अमोल आगरकर ,बाबासाहेब शिरभाते ,गडवाले काका ,आकाश भातकुलकर ,ऋतिक मातोडकर ,सौरव गुल्हाने, नामदेव गुल्हाने, अविनाश राजगुरू , निलेश शिरभाते, हरीश हजारे ,निखिल बिजवे, विजय माहोरे ,बबलू अंबाडेकर, मधुकर गुल्हाने, रमेश शहाडे, वासुदेव गुल्हाने ,संजय मापले ,रवींद्र गुल्हाने , निर्मला बोंडे, रंजना घांडगे, रंजना चामठ ,प्रणिता शिरभाते ,वंदना किल्लेकर, जया जावरे, मिनाशी राव, सत्यप्रकाश गुप्ता, संगीता मळावे, सागर शिरसाट इत्यादी ओबीसी समाजबांधव उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.स्वप्निल खेडकर यांनी केले तर आभार सागर शिरभाते यांनी मानले
सामाजिक व राजकीय प्रतिनिधी :- संकेत संतोष काळे