कर्जत दि ०३:-हिंगोली येथील एक भामटा कर्जत मधील टायर दुकानदारांना टायरचा डीलर असल्याचे भासवून ६ लाख ८३ हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्यास कर्जत पोलिसांनी त्याच्या राहत्या घरून अटक केली असून त्याच्याकडून फसवणूक केलेली ४ लाख रुपये रक्कम जप्त करण्यात आले आहे. गणेश पिंगळकर हा टायरचा डिलर आहे असे भासवून टायर दुकानदारांकडून टायरची ऑर्डर करीता पैसे अकाउंटला मागून घेत असे आणि त्यांना टायर न देता मिळालेले पैसे फसवणूक करून स्वतःकडे ठेवत असे.गणेश कांताराव पिंगळकर, (वय ३१)रा.हिंगोली. जिल्हा असे त्याचे नाव आहे.कर्जत मधील टायर दुकानदारास ६ लाख ८३ हजार रू ची फसवणूक केली. त्या संदर्भात जानेवारी महिन्यात कर्जत पोलीस स्टेशन गु.र.न १९/२०२१ भादवी कलम ४२०,४०६ प्रमाणे फिर्याद दाखल झाली. त्यानुसार पोलसांनी तपास सुरु केला.परंतु आरोपी गणेश कांताराव पिंगळकर हा पुणे तसेच मुबई फिरून पोलिसांना चकवा देत होता. पोलीस निरिक्षक चंद्रशेखर यादव याचे सुचना व मार्गदर्शनाखाली आरोपीचा शोध चालूच होता. आरोपी हा त्याचे मूळ गावी हिंगोली जिल्हा येथे असल्याची गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळताच कर्जत पोलिसांनी एक टीम पाठवून आरोपी गणेश कांताराव पिंगळकर, यास ताब्यात घेतले असता त्याने गुन्हा केल्याचे कबूल केले असून सदर गुन्ह्यात अटक करून गुन्ह्याचा पुढील तपास स.पो.नि सुरेश माने करत आहेत.या अटक केलेल्या आरोपीवर यापूर्वी फसवणुकीचे ६ गुन्हे दाखल आहेत.
सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक मनोज पाटील, पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल,उप विभागीय पोलीस अधिकारी कर्जत आण्णासाहेब जाधव यांचे मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव,सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश माने, पोलीस अंमलदार श्याम जाधव,सुनिल खैरे, सचिन वारे यांनी केली आहे.
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे