कर्जत दि ११:- तालुक्यातील भोसे गावातील महेंद्र तुकाराम चव्हाण, वय ३१ वर्ष याने भोसे येथील आरोग्य केंद्रातील महिला कर्मचारी यांना काही दिवसांपूर्वी कोविड बाबत व इतर कामकाज करत असताना त्यांना शिवीगाळ दमदाटी केली होती. तसेच महेंद्र याने दारूच्या नशेत गावातील नागरिक व महिला यांना मारहाण करणे,शिवीगाळ करणे,गावात नेहमी दहशत निर्माण करणे.यामुळे गावातील जनता भयभीत झाली होती.त्यामुळे नागरिकांनी त्याचेविरुद्ध तक्रार नोंदवून त्याच्यावर कर्जत पोलिस स्टेशन प्रतिबंधात्मक प्रस्ताव क्रमांक २/२०२१ सीआरपीसी २५१(३) प्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाई करून सदर इसमास १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडी देण्यासाठी मा. प्रथम न्यायदंडाधिकारी यांना तसा प्रस्ताव सादर करण्यात आला होता.मा.प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कर्जत यांनी सदर बाबत म्हणणे ऐकून सदर इसमास दिनांक २२/०७/२०२१ पर्यंत १४ दिवसांची कोठडी सुनावली आहे. सदर इसमास १४ दिवस स्थानबद्ध करून न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आल्याने भोसे गावातील जनता समाधानी होऊन जनतेने पोलिसांचे आभार मानले आहे.सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक मनोज पाटील अहमदनगर जिल्हा,अपर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल,उप विभागीय पोलीस अधिकारी कर्जत भागआण्णासाहेब जाधव यांचे मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस जवान सुनील माळशिखरे,भाऊसाहेब यमगर,विकास चंदन यांनी केली आहे.
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे