कर्जत दि ११:- बेकायदा लाकूड वाहतूक करणारा टेम्पो वनपरिक्षेत्र रेहेकुरी अभयारण्य वनविभाग कार्यालयाच्या आवारातून पळवल्या प्रकरणी टेम्पो मालक पंकज पंढरीनाथ बाबर व अनोळखी दोन व्यक्ती यांचे विरुद्ध कर्जत पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी कि, दि.जानेवारी २०२१ रोजी ७:३० वाजेच्या सुमारास वनपाल आर.के.पवार यांनी त्यांचे बरोबर असलेल्या स्टाफच्या मदतीने कापरेवाडी गावच्या शिवारात टेम्पो नंबर एम.एच.०४ इ.वाय.१५५९ या वाहनातून विनापरवाना बेकायदा लिंबू प्रजातीची झाडे तोडून लाकूड घेऊन त्याची वाहतूक करीत असताना मिळून आल्याने सदरचा टेम्पो हा कारवाई करणेकामी वनपरिक्षेत्र रेहेकुरी अभयारण्य इथे आणून लावला होता. टेम्पो व टेम्पो मालक पंकज पंढरीनाथ बाबर रा. बेलगाव ता. कर्जत याच्यावर भारतीय अधिनियम १९२७ चे कलम ४१व ५२ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. त्याचा तपास चालू असतानाच दि.९ जुलै रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास पाऊस चालू असताना टेम्पो मालक पंकज पंढरीनाथ बाबर याने त्याच्या २ अनोळखी मित्रांसोबत मोटार सायकल वर येऊन टेम्पो लावलेले ठिकाणी वनपाल किसन एकनाथ नजन यांचे रखवाली असलेला टेम्पो वरील लोकांनी वनपाल यांचे संमतीशिवाय पळवून नेला.घडलेल्या घटनेनुसार वनपाल किसन एकनाथ नजन यांचे फिर्यादीवरून पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर ४३७/२०२१ भादवी कलम१८६,१८९,३७९,३४ प्रमाणे टेम्पो मालक पंकज पंढरीनाथ बाबर व अनोळखी दोन व्यक्ती विरुद्ध कर्जत पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार पो.ना यमगर हे करत आहेत.
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे