पुणे दि १२ :- अंधश्रद्धेला बळी पडून एक पुण्यातील उच्चशिक्षित कुटुंबातील पतीने पत्नीचा छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी राजकीय गुरु म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रघुनाथ येमुल याच्यासह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, चतुःश्रृंगी पोलिसांनी येमुलला अटक केली आहे. रघुनाथ येमुल याने ‘तुझ्या पत्नीचा पायगुण चांगला नाही. तिला सोडून दे’, असं सांगत काही विधी करण्याचाही सल्ला दिला होता.रघुनाथ राजाराम येमुल (वय ३६, रा. बाणेर) असं आरोपीचं नाव असून, त्याला राजकीय गुरू म्हणून ओळखलं जातं. गणेश नानासाहेब गायकवाड असं तक्रार दाखल केलेल्या महिलेच्या पतीचं नाव आहे. या प्रकरणात गणेश गायकवाडसह आठ जणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पीडित महिला उच्चशिक्षित कुटुंबातील असून, २३ जानेवारी २०१७ पासून त्यांचे पती गणेश गायकवाड छळ करत आहेत. सिगारेटचे चटके देणे, बहिरापणा येईपर्यंत मारहाण करणे अशा स्वरूपाचा कौटुंबिक हिंसाचार गायकवाड यांच्याकडून करण्यात आला. या प्रकरणी पीडित महिलेनं मागील महिन्यात पतीसह आठ जणांविरोधात तक्रार दिली होती. तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी सर्वांविरुद्ध गुन्हा दाखल केला. दरम्यान, या प्रकरणात सहा जणांना अटक पूर्व जामीन मिळाला असून, पती गणेश गायकवाड आणि अन्य एक जण अद्याप फरार आहे.या संपूर्ण प्रकरण रघुनाथ राजाराम येमुल याच्या सांगण्यावरून घडल्याचं प्रकार समोर आलं आहे. महिलेचा पती गणेश गायकवाड याला हे सर्व कृत्ये येमुलने करण्यास सांगितल्याचे फिर्यादी महिलेनं तक्रारीमध्ये म्हटलं आहे. ‘तुझ्या पत्नीचा पायगुण चांगला नाही. तिला सोडून दे. जर तुझी ही पत्नी म्हणून अशी कायम राहिली, तर तु आमदार होणार नाही आणि मंत्री होणार नाहीस; त्यामुळे तिला लवकरात लवकर सोडचिठ्ठी दे आणि मुलाला तिच्या ताब्यातून काढून घे. मी लिंबू देतो, ते लिंबु उतरविल्यावर तुझ्या मागची पिडा कायमची निघून जाईल’, असा येमुलने गायकवाडला दिला होता. त्यानंतर पती गणेश याने महिलेवरून लिंबूही ओवाळून टाकला होता.याप्रकरणी 27 वर्षीय पिडीत महिलेने फिर्याद दिली आहे. गुन्हा दाखल असलेल्यांकडून वेळावेळी फिर्यादीला वेळावेळी मानसिक व शारीरिक त्रास होत होता. दरम्यान, ज्योतिषी रघुनाथ येमूलने पिडीत महिलेचा संसार मोडण्यासाठी अनिष्ठ रूढी व अघोरी कृत्याचवा वापर केला. फिर्यादीच्या बेडरूमच्या बाहेर हळदी कंकू लावलेल्या टाचण्या मारलेले लिंबु ठेवले. होते व आरोपी येमुल याचा सहभाग असल्याचे फिर्यादीचे म्हणणे आहे. त्याचा तपास करण्यासाठी चतुःश्रृंगी पोलिसांनी येमुलला अटक केली आहे.त्याला न्यायालयात हजर देखील करण्यात आले होते.न्यायालयाने त्यास पोलिस कोठडी सुनावली आहे.गुन्हयाचा पुढील तपास पी.एस.आय पंदरकर करीत आहेत.