पुणे दि १६ :- संपूर्ण महाराष्ट्रात राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे यंदाचा दहावीचा निकाल १ वाजता जाहीर झाला आहे. यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आणि आता अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल जाहीर होणार आहे. त्यापूर्वी दहावीच्या निकालासंदर्भात शिक्षण मंडळाची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी यंदा दहावीचा निकाल ९९.९५ टक्के लागल्याचे राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी जाहीर केले. यंदाच्या दहावी निकालात मुलींनीच बाजी मारली आहे.आज नऊ विभागीय मंडळांचा दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळाचा समावेश आहे.राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील जाहीर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या विभागीय मंडळांमधून एकूण १५ लाख ७५ हजार ८०६ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज भरला होता.त्यापैकी १५ लाख ७५ हजार ७५२ विद्यार्थ्यांची संपादणूक शाळांकडून प्राप्त झाली आहे. यंदा १५ लाख ७४ हजार ९९४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल ९९.९५ टक्के लागला आहे. यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यींनीचा निकाल ९९.९६ टक्के असून विद्यार्थ्यांचा निकाल ९९.९४ टक्के आहे. तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल ९७.८४ टक्के लागला आहे.यंदा दहावीच्या निकालात कोकण विभाग अव्वल आहे. १०० टक्के कोकणाचा निकाल लागला असून सर्वात कमी निकाल नागपूर विभागाच ९९.८४ टक्के लागला आहे.
विभागनिहाय टक्केवारी
पुणे – ९९.९६
नागपूर – ९९.८४
औरंगाबाद – ९९.९६
मुंबई – ९९.९६
कोल्हापूर – ९९.९२
अमरावती – ९९.९८
नाशिक – ९९.९६
लातूर – ९९.९६
कोकण – १००
एकूण ९९.९५
दरम्यान २७ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. राज्यातून नियमित उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी ६ लाख ४८ हजार ६८३ विद्यार्थी प्राविण्यासह प्रथम श्रेणीत, ६ लाख ९८ हजार ८८५ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, २ लाख १८ हजार ७० विद्यार्थी द्वितीय श्रेणीत, ९ हजार ३५६ विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत झाले आहेत.दरम्यान २७ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. राज्यातून नियमित उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी ६ लाख ४८ हजार ६८३ विद्यार्थी प्राविण्यासह प्रथम श्रेणीत, ६ लाख ९८ हजार ८८५ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, २ लाख १८ हजार ७० विद्यार्थी द्वितीय श्रेणीत, ९ हजार ३५६ विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत झाले आहेत. राज्यातील २२ हजार ७६७ शाळांतून १६ कोटी ५८ हजार ६१४ विद्यार्थांनी नोंदणी केली होती. मार्च २०२०च्या निकालाच्या तुलनेत ४.६५ टक्के यंदाचा निकाल जास्त आहे. खासगी विद्यार्थी म्हणून नोंदणी केलेल्या विद्यार्थींची एकूण संख्या २८ हजार ४२४ एवढी असून त्यांचा निकालाची टक्केवारी ९७.४५ टक्के आहे.