श्रीगोंदा दि १७ :-केंद्रातील भाजप सरकारने अच्छे दिन आने वाले है चा नारा देत सत्ता मिळविली पण महागाई वाढवून कोरोना संकट काळात लोकांची चेष्टा केली. याच्या निषेधार्थ येथील युवक काँग्रेस,तालुका युवक काँग्रेस वतीने युवक काँग्रेसचे प्रदेश महासचिव प्रशांत ओगले यांच्या नेतृत्वाखाली बैलगाडी रॅली काढून अनोखे आंदोलन करत सरकारचे लक्ष वेधले.तुळशीदास मंगल कार्यालय येथून बैलगाडी रॅलीस प्रारंभ झाला. तहसील कार्यालय येथे रॅली आल्या नंतर तहसीलदार प्रदीप पवार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तसेच शिवसेना पदाधिकारी यांनी रॅलीस पाठिंबा दिला.यावेळी बोलताना प्रशांत ओगले म्हणाले केंद्रात सत्ता मिळवताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दरवर्षी २कोटी रोजगार,महागाई कमी करू असे आश्वासन दिले प्रत्यक्षात १२कोटी बेरोजगारी वाढली महागाई कमी झाली नाही. उलट कोरोना काळात रोजगार गमावलेल्या लोकांना मदत करण्याऐवजी पेट्रोल,डिझेल,गॅस चे दर वाढवून आधीच पिचलेल्या लोकांना महागाईच्या खाईत लोटले.अशी टीका करत सरकारने कोरोना संकट तातडीने महागाई कमी करून तसेच इंधन दरवाढ कमी करावी.अशी मागणी करत मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ओगले यांनी दिला.यावेळी श्रीगोंदा तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष डॉक्टर गोरख बायकर,शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष योगेश मेहेत्रे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष ऋषिकेश गायकवाड, शिवसेना तालुकाप्रमुख बाळासाहेब दुतारे, वडाळी गावचे सरपंच महेश दरेकर, संदीप उमाप, संदीप वागस्कर, नितीन खेडकर, प्रशांत सिदनकर, पवन मोहिते आदी कार्यकर्ते उपस्थित होते ७०च्या दशकात स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांनी इंधन दरवाढी विरुद्ध तत्कालीन इंदिरा गांधी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बैलगाडी रॅली काढल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.त्याच धर्तीवर प्रशांत ओगले यांनी रॅली काढल्याची चर्चा यावेळी होती.
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे