• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Thursday, May 22, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

पुणे शहर पोलीस आयुक्तांचा आणखीन एक दणका दहशत निर्माण करणाऱ्या गुंड महेश ऊर्फ बंटी पवार टोळीवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
17/07/2021
in क्राईम
Reading Time: 1 min read
0

पुणे दि १७ :- सिंहगड रोड परिसरात स्वतःला भाई समजून दहशत निर्माण करणारा सराईत गुंड महेश उर्फ बंटी प्रकाश पवार आणि त्याच्या साथीदारांवर मोक्का कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. 2015 साली त्याच्यावर मोक्का लावण्यात आला होता. परंतु 2019 साली बाहेर सुटल्यानंतर त्यांनी पुन्हा गंभीर गुन्हे केले होते. त्यामुळे पुन्हा एकदा त्याच्यावर मोक्का नुसार कारवाई करण्यात आली आहे.
महेश उर्फ बंटी प्रकाश पवार (वय 36), शुभम बबन वाघमारे (वय 26) आणि प्रवीण बाळासाहेब ढाकणे (वय 19) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यावर मोक्कानुसार कारवाई करण्यात आली आहे.याप्रकरणी अधिक माहिती अशी की, बंटी पवार हा सिंहगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तुकाई नगर येथे राहतो.त्याने त्याच्या साथीदारांसह खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, दरोडा, जबरी चोरी, अपहरण, बलात्कार, बेकायदेशीर शस्त्र जवळ ठेवणे, दहशत निर्माण करणे यासारखे गंभीर गुन्हे मागील काळात केले होते. त्यामुळे 2015 मध्ये त्याच्यावर मोक्का कायद्यानुसार कारवाई करण्यात आली होती. 2019 मध्ये कारागृहातून बाहेर आल्यानंतर स्वतःचे अस्तित्व लपवून राहू लागला.
तसेच वरील आरोपींना सोबत घेऊन त्याने पुन्हा गंभीर गुन्हे करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे पोलिसांनी पुन्हा त्याला अटक करून येरवडा तुरुंगात रवानगी केली होती.
परंतु कोरोना प्रादुर्भावाचा फायदा घेत न्यायालयातून तात्पुरत्या जामीनावर तो जानेवारी 2020 मध्ये येरवडा जेलमधून बाहेर आला होता. यानंतर त्याने वरील दोन आरोपींच्या मदतीने गांजा विक्री करण्यास सुरुवात केली होती. 20 जून रोजी सिंहगड पोलिसांनी पाच लाखाच्या गांजासह आरोपींना पकडले होते. अधिक तपासामध्ये बंटी पवार याने इतर आरोपींना सोबत घेऊन व्यवसाय सुरू केले असल्याचे निष्पन्न झाले होते.
त्यामुळे या आरोपींवर मोक्का कायद्यानुसार कारवाई करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास गवारे यांनी पोलीस उपायुक्त पूर्णिमा गायकवाड यांच्यामार्फत अप्पर पोलीस आयुक्त संजय शिंदे यांच्याकडे पाठवला होता. त्यानंतर या आरोपींची गुन्हेगारी स्वरूपाची पार्श्वभूमी पाहता त्यांच्यावर संजय शिंदे यांनी मोक्का कायद्यानुसार कारवाई केली आहे.ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली ,पोलीस सह आयुक्त , डॉ रविंद्र शिसवे , अपर पोलीस आयुक्त , पश्चिम प्रादेशिक विभाग , डॉ संजय शिंदे , पोलीस उप आयुक्त , परीमंडळ ३ पुणे शहर श्रीमती पौर्णिमा गायकवाड , सहाय्यक पोलीस आयुक्त , सिंहगड रोड विभाग , पुणे शहर श्रीमती पौर्णिमा तावरे यांचे मार्गदर्शनाखाली .देवीदास घेवारे – वरिष्ठ पोलीस निरीक्षक , सिंहगडरोड पो.स्टे , प्रमोद वाघमारे , पोलीस निरीक्षक , गुन्हे सिंहगड रोड पो स्टे , सपोनि चेतन थोरबोले , पोउपनि कुलदीप संकपाळ , पोलीस कर्मचारी प्रमोद कळमकर , मोहन भुरुक , आबा उत्तेकर , राजेश गोसावी , शंकर कुभांर , उज्ज्वल मोकाशी , सचिन माळवे , दयानंद तेलंगेपाटील , पुरुषोत्तम गुन्ला , योगेश झेंडे , धनाजी धोत्रे , अविनाश कोंडे , राहुल शेडगे , किशोर शिंदे , रफिक नदाफ , सागर भोसले , गिरीष एर्कोगे , शैलेष चव्हाण यांचे पथकाने केली आहे . मा.पोलीस आयुक्त , पुणे शहर , अमिताभ गुप्ता यांनी कार्यभार हाती घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष ठेवुन असुन गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर अधिक भर देण्याबाबत सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश देण्यात आले आहेत . त्यांचे मार्गदर्शनाखाली मोक्का अंतर्गत झालेली ही ३ ९ वी कारवाई आहे .

Previous Post

समाजात उल्लेखनीय व यशस्वी काम करणा-या लोकांनी विनम्रता अंगीकारून समाजाचे नेतृत्व करावे- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

Next Post

कार अडवून तळेगाव दाभाडे परिसरात दोघा भावांना बेदम मारहाण

Next Post

कार अडवून तळेगाव दाभाडे परिसरात दोघा भावांना बेदम मारहाण

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In