पुणे, दि.२१ :- विमानतळ येथील उच्च शिक्षित महिलेला 24 लाख ऊसने दिल्यानंतर चार महिला व त्यांच्या एका साथीदारांने गेल्या 7 वर्षात 24 लाखासोबतच व्याजासह तब्बल दीड कोटी रुपये घेतल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात समोर आला आहे. पोलीसांनची ओळख असल्याची धमकी देत पैसे उकळलेे आहेत. तर आणखी सव्वा कोटी रुपये बाकी असल्याची धमकी महिलेचे व त्यांच्या आईचे अपहरण करत घरात डांबून ठेवल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे.शगुप्ता सय्यद (वय 46), फरीदा युसूफ खान (वय 42, रा. वानवडी), आबिद शब्बीर साहा उर्फ डी. जे (वय 34, रा. खडकी), असमा नईम सय्यद (वय 35, रा.भवानी पेठ) आणि शहनाझ आसिफ शेख (वय 49, रा हडपसर) अशी अटक करण्यात आलेल्याची नावे आहेत. याबाबत 45 वर्षीय महिलेने विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार खंडणी, अपहरण, सावकारी यासह इतर कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे वडील आजारी होते. त्यांना उपचारासाठी पैशांचीआवश्यकता होती. त्यामुळे त्यांनी वडिलांच्या उपचारासाठी आरोपींची मदत घेत त्यांच्याकडून पैसे घेतले होते. त्यांनी 2014 मध्ये पैसे घेतले होते. व्याजाने हे पैसे घेतले गेले होते. तर त्यानंतर फिर्यादी व त्यांच्या बहिणीकडून आरोपी शगुप्ता हिने 29 लाख 23 हजार घेतले. तर फरीदा खान हिने 78 लाख 32 हजार तसेच असमा सय्यद हिने 29 लाख 4 हजार आणि शहनाझ हिने 6 लाख 62 हजार रुपये असे एकूण 1 कोटी 43 लाख 23 हजार 635 रुपये घेतले.त्यानंतर देखील फिर्यादी व त्यांच्या आईला शिवीगाळ व दमदाटी करत रिक्षात बसवून फरीदा खानने तिच्या घरात डांबून ठेवले. त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांना बेदम मारहाण केली. त्यानंतर पुन्हा रिक्षातून दोघींना त्यांच्याच घरी आणले. तसेच त्यांच्याकडून ब्लॅक चेकवर सह्या घेतल्या. तर कोऱ्या स्टॅम्प पेपरवर फिर्यादी व त्यांच्या आई यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या. तर या महिलांनी आमची पोलीस खात्यात चांगली ओळख असून, आमचे नातेवाईक देखील पोलीस आहेत. आम्ही तुम्हाला खोट्या गुन्ह्यात अडकवू अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. दरम्यान फिर्यादी यांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी प्राथमिक चौकशी करत गुन्हा दाखल केला आहे. तसेच या पाच जणांना अटक केली आहे. अधिक तपास विमानतळपोलीस करत आहेत.फिर्यादी या उच्च शिक्षित आहेत. त्यांच्या आईचा केटरिंगचा व्यवसाय आहे. येथे कामाला येणाऱ्याकामगार महिलांकडून फिर्यादी यांची फरीदाशी ओळख झाली होती. त्यानंतर फिर्यादी यांनी फरीदा
हिच्याशी संपर्क साधला होता. त्यांनी फक्त 24 लाख रुपये दिले होते. पण, त्यानी गेल्या 7 वर्षात
फिर्यादी व त्यांच्या बहिणीकडून तबल 1 कोटी 43 लाख रुपये, ब्लँक चेक, कोऱ्या स्टॅम्पवर स्वाक्षऱ्याघेतल्या आहेत. तर आणखी सव्वा कोटी रुपये द्यावे लागतील असे म्हणत फिर्यादी यांच्या कुटुंबालाधमकावत पैसे मागत होते, असे पोलिसांनी सांगितले आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक मंगेशजगताप हे करत आहेत या पाच जणांना अटक केल्यानंतर आज न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने या पाच जणांना 5 दिवसांचीपोलीस कोठडी सुनावली आहे.