कर्जत दि २६ :- कर्जत तालुक्यातील भांडेवाडी येथील धनंजय लक्ष्मण दळवी वय (३५)वर्षे यांचे कर्जत येथे साई टायर्स नावाचे दुकान असून त्यांना दुकानात टायर विक्री करण्यासाठी गणेश कांताराव पिंगळकर,(वय३१)रा.हिंगोली.जिल्हा.हिंगोली याने त्याच्या मोबाईलवरून धनंजय दळवी यांना कॉल करून मी अधिकृत टायर विक्रेता असल्याचे सांगून त्याचा जीएसटी नंबर व त्याच्या दुकानाचा नंबर पाठवला. त्यानंतर धनंजय दळवी यांनी आरोपी गणेश कांताराव पिंगळकर याच्या बँक खात्यामध्ये टायर खरेदी करीता १२ लाख ८७ हजार रुपये टाकून त्यापैकी ६ लाख ४ हजार २०० रुपये चे टायर आरोपी गणेश पिंगळकर याने विश्वास संपादन करण्यासाठी बिल न देता पाठवून दिले व उर्वरित रकमेचे टायर्स पाठवले नाहीत.धनंजय दळवी यांनी आरोपी गणेश कांताराव पिंगळकरने पाठवलेल्या जीएसटी नंबरची खात्री केली असता जीएसटी नंबर वैभव मारुती भोसले याचा असल्याची प्राथमिक माहिती मिळाली म्हणून आरोपी गणेश पिंगळकर याने त्याच्या आर्थिक फायद्यासाठी धनंजय दळवी याला अधिकृत विक्रेता असल्याची खोटी माहिती देऊन रक्कम घेऊन विना बिलाचे टायर पाठवून फिर्यादीस उर्वरित रक्कम न देता सदरचा अपहार केल्याचा गुन्हा नोंद केला.
पोलीस निरिक्षक चंद्रशेखर यादव याचे सुचना व मार्गदर्शनाखाली आरोपीचा शोध चालूच होता.आरोपी हा त्याचे मूळ गावी हिंगोली जिल्हा येथे असल्याची गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळताच कर्जत पोलिसांनी एक टीम पाठवून आरोपी गणेश कांताराव पिंगळकर, यास ताब्यात घेतले असता त्याने गुन्हा केल्याचे कबूल केले असून त्याच्याकडून ४ लाख रुपये जप्त करण्यात आले आहे.तसेच त्याचा साथीदार अमित सुभाष जाधव रा. कोथरूड पुणे यास दि.१२ फेब्रुवारी रोजी पुणे येथून अटक करण्यात आली होती.यावेळी आरोपीकडून जप्त केलेले ४लाख रुपये टायर दुकानदार धनंजय दळवी यांचेकडे सुपूर्त करण्यात आले.सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक मनोज पाटील, पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल,उप विभागीय पोलीस अधिकारी कर्जत आण्णासाहेब जाधव यांचे मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव,सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश माने, पोलीस अंमलदार श्याम जाधव,सुनिल खैरे, सचिन वारे यांनी केली आहे.
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे