पुणे ग्रामीण,दि. २५ :- पुणे जिल्ह्यातील सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याशी गोळवेडी येथील सानवी रिसॉर्टमध्ये शनिवारी डान्स पार्टी सुरु होती. या डान्स पार्टी पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून हॉटेल मालकासह 6 पुरूष व 4 महिलांवर गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये हॉटेल मालकाचा मित्र असलेला आणि आंबेगाव मधील भाकरे मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल मधील डॉक्टर निखील भाकरे अंधाराचा फायदा घेऊन फरार झाला आहे.हा प्रकार उघडकीस आल्याने पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.याप्रकरणी विनय सुभाष कांबळे (वय-32 रा. आकाश नगर, वारजे), संदीप शंकर कोतवाल (वय-47 रा. हिंगणेमळा, हडपसर), सचिन विठ्ठल शिंदे(वय-38 रा. आनंदनगर, सिंहगड रोड), कालीदास शशिराव काकडे (वय-50 रा. हडपसर), विठ्ठल विजय मोरे (वय-43 रा. हडपसर), राजेश बलभिम वाघमारे (वय-45 रा. हडपसर) व चार महिलांवर हवेली पोलीस ठाण्यात नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर डॉ. निखील भाकरे फरार झाला आहे.पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस पथक हद्दीत गस्त घालत असताना सिंहगड पायथ्याशी गोळेवाडी येथील सानवी रिसॉर्टमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग करुन डान्स पार्टी सुरु असल्याची माहिती मिळाली. रिसॉर्ट मालक विनय कांबळे आणि आंबेगाव मधील दत्तनगर चौकात असलेल्या भाकरे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ. निखील भाकरे यांनी डान्सपार्टीचे आयोजन केले होते. पोलिसांनी याठिकाणी छापा टाकला असता साउंड सिस्टीमवर गाणी लावून एल.ई.डी लावून काही लोक नाचत असल्याचे दिसले.
या ठिकाणी नाचणाऱ्या व्यक्तींनी आणि इतर चार महिलांनी तोंडाला मास्क न लावता नाचत असल्याचे दिसून आले.पोलिसांनी सहा पुरुष आणि चार महिलांवर कारवाई करुन त्यांच्यावर हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. व त्यादरम्यान, पोलिस आल्याचे समजताच डॉ. निखील भाकरे हा अंधाराचा फायदा घेऊन फरार झाला. सदरची कार्यवाही डॉ . अभिनव देशमुख पोलीस अधिक्षक पुणे.ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली , अप्पर पोलीस अधिक्षक पुणे . विवेक पाटील , स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट , सहा.पो निरी नेताजी गंधारे , पोहवा पासलकर , पोहवा क्षिरसागर पो.शि. मंगेश भगत , पोशि अमोल शेडगे मपोहवा नंदा कदम यांनी केली आहे .