पुणे,दि.२६:- पुणे शहर पोलिसांनी कोंढवा परिसरात एका हुक्का पार्लवर छापा टाकुन कारवाई केली आहे. या ठिकाणाहून 4 हुक्का पार्लर सील, चार चिलीम व इतर साहित्य असा 35 हजार 600 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आले आहे. हॉटेल क्लब 24 वर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाई केली आहे.हॉटेल मालक अमर खंडेराव लटुरे (रा. महंमदवाडी) व मॅनेजर विक्रम सुखदेव जाधव (वय 30) यांच्यावर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील दोराबजी येथील हॉटेल क्लब 24 मध्ये अवैधरित्या हुक्का बार सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती.त्यानुसार सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने याठिकाणी सापळा रचून छापा टाकला. यावेळी दोघेजण हुक्का पार्लर चालवत असल्याचे आढळून आले. त्यानुसार पोलिसांनी सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम 2018 चे कलम 4 अ, 21 अ तसेच भादवी कलम 188, 269, 270 तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. सदरची उल्लेखनिय कामगिरी मा.पोलीस आयुक्त , पुणे शहर अमिताभ गुप्ता , पोलीस सह – आयुक्त डॉ.रविंद्र शिसवे , अपर पोलीस आयुक्त , अशोक मोराळे , गुन्हे शाखा पुणे , पोलीस उप – आयुक्त ,श्रीनिवास घाडगे , गुन्हे शाखा पुणे शहरयांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिल्पा चव्हाण सामाजिक सुरक्षा विभाग , गुन्हे शाखा , वरिष्ठ पोलीस निरीक्षक.खांडेकर , अंमली पदार्थ विरोधी पथक -२ , गुन्हे शाखा , पुणे शहर व पोलीस अंमलदार यांनी केली आहे .