औरंगाबाद/गंगापूर, दि.२९ :- दोन वर्षापेक्षा जास्त काळ देशासह जगात कोरोना रोगाने थैमान घातले आहे. रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी वारंवार प्रशासनाकडून ताळेबंदी केली जाते. त्यामुळे साहजिकच शेतकरी , कामगार व व्यापारी यांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागते. या अङचणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना.ऊद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडण्यासाठी भाजपचे गंगापूर विधानसभा मतदारसंघात तीन वेळा निवडून आलेले आ.प्रशांत बंब गेली दीड वर्षापासुन मुख्यमंञ्यांच्या भेटीच्या प्रतिक्षेत आहेत. वारंवार भेटीसाठी पञव्यवहार करुनही त्यांना कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याचे त्यांनी एका व्हिडियोद्वारे जाहीर केलं आहे. हा व्हिडियो सोशल मिडियावर खूपच व्हायरल होत आहे.कोरोना काळात लाॕकडाऊन मध्ये योग्य नियोजन नसणे,आरोग्य विभागात डाॕक्टर व कर्मचारी यांची अपुरी संख्या आणि रखडलेली भरती प्रक्रिया , शाळा व काॕलेज यांच्या फी व आॕफलाईन चालु करणे, पिकविमाप्रश्नी त्यांना मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी बोलायचं आहे. मराठवाड्यातील शासकीय योजना व अपुरी कामे असताना त्यामध्ये झालेला शेकडो कोटींचा भ्रष्टाचार त्यांनी पुराव्यासहित संबंधित मंञ्याना सादर केल्याचं त्यांनी सांगितलं. मुंबईनंतर शिवसेनेचं पहिले प्रेम मराठवाडा आहे , हजारो शेतकरी आत्महत्या होतात आणि भविष्यातील आत्महत्या रोखण्यासाठी वेळीच पाऊले ऊचलावी लागतील , गतवेळी झालेल्या अधिवेशनात सर्वपक्षीय आमदारांना प्रश्न मांडण्यासाठी पुरेसा वेळ दिला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.