पुणे, दि.०१ :- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती आज उत्साहात पार पडली. पुण्यातील सारसबाग येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठेंच्या पुतळ्याला पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते पुष्पहार घालून सकाळी १० वा या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी उपमहापौर सुनीता वाडेकर, स्वागताध्यक्ष राजाभाऊ धडे, सचिव संजय केंदळे, सुजित रणदिवे आदी मान्यवर उपस्थित होते.पहाटेपासूनचं सारसबाग येते पुणे जिल्ह्यातील विविध संघटनांनी अण्णा भाऊंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. पुणे शहर जिल्हा मातंग समाज यांच्यावतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पूर्ण खबरदारी घेऊन सदरील कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडला. या ठिकाणी पुणे पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला होता.यावेळी वेळी सामाजिक न्यायमंत्री ना. विश्वजित कदम, महसूलमंत्री ना बाळासाहेब थोरात, महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, मा आमदार मोहन जोशी, झोपडपट्टी सुरक्षा दलाचे अध्यक्ष भगवानराव वैराट, नगरसेवक सुभाष जगताप, सचिन जोगदंड, निलेश वाघमारे, दत्ता जाधव, आनंद शिंदे, रविभाऊ दयानंद, ऍड. महेश सकट, ऍड राजश्री अडसूळ आदी मान्यवरांनी अण्णा भाऊंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.