पुणे, १२ :- झेनेक्स इनोव्हेशन प्रा.लि. व पुणे ट्रॅफिक पोलिस यांच्या संयुक्त विद्यमाने टेनएक्स ट्रू रायडर्स हेल्मेट राईडला उत्सफूर्त प्रतिसाद मिळाला.आहे रस्ता सुरक्षा आणि हेल्मेटचा वापर याबद्दल जनजागृती करण्याच्या हेतूने या राईडचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी १५०० हून अधिक नागरिकांनी यांत सहभाग नोंदविला.यामध्ये संचेती हॉस्पिटलच्या १०० हून आदिक डॉक्टरांनी या मध्ये सहभागी झाले होते.ही राईड सीझन्स मॉल,मगरपट्टा,गोळीबार मैदान,एमजी रोड,सणस ग्राऊंड स्वारगेट,डीपी रोड कोथरूड,बालेवाडी आणि ऑटो क्लस्टर चिंचवड या वेगवेगळ्या ६ ठिकाणांवरून सुरू होऊन शिवाजीनगर येथील पोलिस परेड ग्राऊंड येथे संपली. याप्रसंगी पुणे पोलिस आयुक्त डॉ.के.वेंकटशम, झेनेक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनुज गुप्ता,डीसीपी ट्रॅफिक पोलिस तेजस्वी सातपुते,संचेती हॉस्पिटलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.पराग संचेती,सहाय्यक पोलिस आयुक्त एसीपी नीलिमा जाधव,सहाय्यक पोलिस आयुक्त राजेंद्र सावंत, रोटरी क्लब ऑफ आकुर्डीचे अध्यक्ष गणेश जामगावकर आणि आरजे बंड्या आदी मान्यवर उपस्थित होते.
डीसीपी ट्रॅफिक पोलिस तेजस्वी सातपुते म्हणाल्या की, जीवाला धोकादायक ठरू शकतात,असे दहा विविध प्रकारचे वाहतुक नियम उल्लंघन असतात. त्यामध्ये मद्यपान करून गाडी चालविणे,ट्रीपल सीट चालवणे,हेल्मेट व सीटबेल्ट वापर न करणे,सिग्नल तोडणे अशा नियम उल्लंघनांचा समावेश आहे. आजची हेल्मेट राईड याबाबत जागृती करण्यासाठी होती.हेल्मेटबाबतचा कायदा हा आधीपासून होता व त्याची अंमलबजावणी देखील होत होती.यावर्षी आम्ही अधिक जागरूकता निर्माण करून ही अंमलबजावणी अधिक तीव्र करीत आहोत.
झेनेक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनुज गुप्ता म्हणाले की,हेल्मेटच्या वापराबाबत जागृती निर्माण करणे हा या उपक्रमाचा हेतू होता.आम्ही सातत्याने हा उपक्रम सुरू ठेवू ज्यामुळे अधिक जागृती होईल.यावर्षी १५०० हून अधिक लोकांनी सहभाग घेतला.पुढील वर्षी हा आकडा ५००० पर्यंत जाईल असा मला विश्वास व्यक्त केला आहे