पुणे, दि.१७ :दि २२ ऑगस्ट रोजी राखी पौर्णिमेनिमित्त ‘एक राखी डॉक्टरांसाठी’ करोनाच्या पार्श्वभूमीवर मा. नगरसेवक. सनी ऊर्फ चंद्रशेखर विनायक निम्हण यांनी अनोखा उपक्रम आयोजित केला आहे. पाषाण,औंध, सोमेश्वरवाडी,आणि इतर परिसरातील हजारो भगिनींशी प्रत्यक्ष संपर्क साधून त्यांनी आतापर्यंत 15 हजारांहून अधिक भगिनींच्या नावे राखी महाराष्ट्रातील करोनाकाळात कोरोना योद्धा म्हणून काम करणार्या डॉक्टर व वैद्यकीय कर्मचार्यांना पाठविण्याची तयारी पूर्ण केली आहे. अजूनही या उपक्रमास वाढता प्रतिसाद मिळत आसल्याने या भगिनींनी सुंदर अक्षरात आपल्या भावना व्यक्त करणारे लिहिलेले पत्र राखीसोबत पाठवले जाणार असून, त्यांच्या नाव, पत्त्यासह ही राखी संपूर्ण महाराष्ट्रातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील हजारो डॉक्टर व
वैद्यकीय कर्मचार्यांना पाठवली जाणार आहे. या अनोळखी भावां विषयी आपलेपणाने कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या हृदयस्पर्शी व अनोख्या उपक्रमात सहभागी होण्यासाठी अपेक्षेपेक्षा मोठा प्रतिसाद मिळाला आहे, असे संयोजक सनी निम्हण यांनी सांगितले करोना संकटकाळात डॉक्टर व वैद्यकीय कर्मचार्यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून केलेली उत्कृष्ट मानवसेवा ही अतिशय प्रेरणादायी बाब आहे. या सर्व अनोळखी डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारी भावांना सुंदर पत्रासह राखी पाठवून कृतज्ञता व्यक्त करण्याच्या कार्यक्रमात सहभागी होता आले याबद्दल भगिनींनी या उपक्रमाला धन्यवाद दिले. त्यांचे नाव व पत्ता राखीसोबत असल्यामुळे राखी मिळालेले डॉक्टर व आरोग्य कर्मचारी त्यांना पत्राद्वारे जरूर धन्यवाद देतील, अशी अपेक्षा असल्याचे सनी निम्हण यांनी सांगितले.
हातावर रक्षेचे बंधन बांधलेले नसतानाही या बांधवांनी हे अलिखित नाते जोपासले आणि सक्षमपणे निभावले आहे. डॉक्टर बांधवांच्या कार्याचा सन्मान म्हणून येत्या रक्षाबंधनाला एक राखी ही आपल्या नावाने त्यांना पाठवण्याचा संकल्प आम्ही केला आहे. राज्यातील हजारो डॉक्टर्स बांधवाना ही राखी आपल्या नावे आपल्या परवानगी नुसार पाठवण्यात येणार आहे. ती राखी डॉक्टर बांधवांना पोहचवण्याची जबाबदारी आम्ही घेऊ. या संदर्भात अधिक माहिती व आपले नाव नोंदविण्यासाठी sunnynimhan.com वर किंवा 8308123555 या व्हाट्सअप नंबर आपले नाव आपण नोंदवू शकता व आम्ही आपल्या वतीने राखी पाठवू असे यावेळी सनी निम्हण यांनी सांगितले.