पुणे, दि.२३ :-गेल्या एक वर्षापासून सराईत गुन्हयांमध्ये फरार असलेल्या आरोपीला समर्थ पोलिसांनी अटक केली आहे.समर्थ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बनावट आधार कार्ड बनविणारा गुन्हयात त्याला अटक करण्यात आली आहे.आरोपी नामे रणजित बबन खेडेकर , वय ३५ वर्षे , रा . खेडेकर मळा , ऊरुळी कांचन पुणे असे अटक केलेल्याचे नाव आहे.
एक वर्षापासून फरार असलेला खेडेकर हा पुन्हा पुण्यात आला असून सध्या त्याचे वास्तव्य ऊरुळी कांचन परिसरात असल्याची माहिती समर्थ पोलिसांना यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीची खातरजमा करण्यात आली. व ऊरुळी कांचन पुणे यास अटक केली आहे तसेच गर्दीचा फायदा घेवून मोबाईल चोरी करणाऱ्या सराईत चोरटयास पोलीसांनी केले जेरबंद केले दि.२० रोजी समर्थ पोलीस ठाणेकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक , यांचे आदेशाने तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी हे हद्दीत प्रट्रोलींग करीत असतांना सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे व पांढऱ्या रंगाची अॅक्टीवा गाडीच्या आरटीओ नंबरच्या आधारे गुन्हयातील अज्ञात आरोपीचा शोध घेत असताना तो त्याचे रहाते घरी मिळून आला. त्यास पोलिसांनी ताब्यात घेवून त्यास त्याचे नांव पत्ता विचारला असता त्याने नाव विनायक राजू पूजारी , वय २७ वर्षे , रा . स.नं. ६६ , डोबर वाडी , घोरपडीगांव , पुणे असे असल्याचे सांगितले . त्यास विश्वासात घेवून त्याचेकडे चौकशी केली असता त्याने दि .१९ रोजी फिर्यादी हे दारुवाला पुल चौक येथे सकाळी १० वा . नायडु स्टोअर्स जवळ असलेल्या इडली वडा सेंटर येथे नाष्टा करीत असताना गर्दीचा फायदा घेवुन त्यांचे शर्टचे खिशातील मोबाईल फोन चोरी केल्याचे सांगीतले.व मोबाईल व अॅक्टीवा गाडी गुन्हयाचे पुरावे कामी जप्त करण्यात आली आहे . सदर बाबत समर्थ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे . तसेच समर्थ पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्हा मधील एक वर्षापासून पाहिजे असलेला आरोपी नामे रणजित बबन खेडेकर , वय ३५ वर्षे , रा . खेडेकर मळा , ऊरुळी कांचन पुणे यास अटक केली आहे . तो बनावट आधार कार्ड अगदी सहजरीत्या बनवून देतो व सदरच्या गुन्हयामध्ये बनावट आधार कार्डचा वापर झालेला असून ते बनावट आधार कार्ड रणजित खेडेकर यानेच बनवून दिले आहे . सदरचा पाहिजे आरोपी हा मागील एक वर्षापासून पोलीसांना गुंगारा देत होता व पत्ता बदली करून रहात असलेने मिळून येत नव्हता . सदरची कामगिरी ही संजय शिंदे , अपर पोलीस आयुक्त , पश्चिम प्रादेशीक विभाग , पुणे शहर , प्रियंका नारनवरे , पोलीस उप आयुक्त , परिमंडळ १ पुणे शहर , सतिश गोवेकर , सहाय्यक पोलीस आयुक्त , फरासखाना विभाग , पुणे विष्णु ताम्हाणे , वरिष्ठ पोलीस निरीक्षक , समर्थ पो.स्टे , उल्हास कदम , पोलीस निरीक्षक , ( गुन्हे ) यांचे मार्गदर्शनानुसार सहा . पोलीस निरीक्षक , संदीप जोरे , सपोउपनिरी सतिश भालेराव , पोलीस अंमलदार सुशील लोणकर , संतोष काळे , सुभाष पिंगळे , हेमंत पेरणे , सुमित खुट्टे , सुभाष मोरे , निलेश साबळे , विठ्ठल चोरमले , महेश जाधव , रिकी भिसे यांनी केली आहे .