पुणे, दि.२३ :- पुणे शहरात गेल्या आठ वर्षापासून वेगवेगळया गंभीर अशा 8 गुन्हयांमध्ये फरार असलेल्या आरोपीला पुणे शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे.कोंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गुन्हयात आता त्याला अटक करण्यात आली आहे.दयानंद झा असे अटक केलेल्याचे नाव आहे. कोंढवा परिसरात 8 वर्षापुर्वी त्याने एक गोडाऊन फोडले होते. गेल्या अनेक वर्षापासून फरार असलेला दयानंद झा हा पुन्हा पुण्यात आला असून सध्या त्याचे वास्तव्य चिखली आणि पिंपरी परिसरात असल्याची माहिती पोलिस हवालदार राजस शेख यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीची खातरजमा करण्यात आली. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अप्पर आयुक्त अशोक मोराळे, ( उपायुक्त श्रीनिवास घाडगे , सहाय्यक आयुक्त लक्ष्मण बोराटे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक जयंत राजुरकर, सहाय्यक निरीक्षक शोभा क्षिरसागर, पोलिस हवालदार राजस शेख, दिपक भुजबळ, प्रविण भालचिम, प्रविण कराळे, चालक पोलिस हवालदार शितल शिंदे यांच्या पथकाने आरोपीची माहिती काढली. आरोपी पिंपळे सौदागर येथील कृष्णा चौकात येणार असल्याचे समजल्यानंतर त्यास सापळा रचुन अटक करण्यात आली.
दयानंद उर्फ दुर्गानंद झा याला ताब्यात घेण्यात आले असून त्याने पुण्यात गंभीर गुन्हे केल्यानंतर बिहारला पळून गेले असल्याची कबुली दिली आहे. त्याच्याकडे सखोल तपास सुरू आहे.सदरची कामगिरी ही अपर पोलीस आयुक्त , अशोक मोराळे , पोलीस उप आयुक्त श्रीनिवास घाडगे , सहा पोलीस आयुक्त गुन्हे -२ लक्ष्मण बोराटे , पोलीस निरीक्षक जयंत राजुरकर यांचे मार्गदर्शनाखाली सहा . पोलीस निरीक्षक शोभा क्षिरसागर , पोलीस उप – निरीक्षक जयदिप पाटील , पोलीस अंमलदार राजस शेख , दिपक भुजबळ , प्रविण भालचिम , प्रविण कराळे , शितल शिंदे , महेद्र पवार , स्वप्निल कांबळे यांनी केली आहे .