पुणे,दि२३ :- पुणे म.न.पा. रस्ते विभागाच्या उप अभियंत्या लाच स्वीकारले प्रकरणी लाचलुचतप प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पुणे महानगरपालिकेच्या उप अभियंत्याला 50 हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहेत.त्यामुळे पुण्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.
सुधीर सोनवणे (उप अभियंता, रस्ते विभाग, टिंगरेनगर,
पुणे महापालिका) असे अॅन्टी करप्शनच्या सापळयात सापडलेल्या मनपाच्या अधिकार्याचे नाव आहे.पुणे महानगरपालिकेच्या उप अभियंत्याला अॅन्टी करप्शनने 50 हजार रूपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे.सुधीर सोनवणे हे पुणे मनपाच्या रस्ते विभागात कार्यरत होते.पुणे मनपा पार्किंगचे आवारात दि . २३/०८/२०२१ यातील तक्रारदार हे बांधकाम ठेकेदार असून त्यांनी सन २०१८ २०१ ९ मध्ये केलेल्या शाळेच्या दुरूस्तीचे कामांचे बील पास झाले नसल्यामुळे लोकसेवक सुधीर सोनवणे यांना ते भेटले असता बील मंजुर करणे व यापुर्वी दुस – या कामाचे बील मंजूर केल्याचा मोबदला म्हणून तक्रारदार यांचेकडे 50 हजार रूपये लाचेची मागणी करून त्यापैकी 40 हजार रुपये लाच रक्कम स्वीकारल्यावर त्यास लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.पुणे लाचलुचतप प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे अप्पर अधीक्षक सुरज गुरव, अप्पर अधीक्षक सुहास नाडगौडा उप अधीक्षक श्रीहरी पाटील
यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे अॅन्टी करप्शनच्या पथकाने ही कारवाई केली आहे.याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून , शिवाजीनगर पोलीस स्टेशन , पुणे शहर येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून तपास भारत साळुखे , पोलीस निरीक्षक , ला.प्र.वि. पुणे युनिट हे करत आहेत .सदरची कारवाई. पोलीस उप आयुक्त / पोलीस अधीक्षक. राजेश बनसोडे , ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र व. अपर पोलीस अधीक्षक. सुरज गुरव , ला.प्र.वि. पुणे , सुहास नाडगौडा , अपर पोलीस अधीक्षक , ला.प्र.वि. पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली . शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयास क्रमांकवर १. हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक १०६४ २. ॲन्टीकरप्शन ब्युरो , पुणे – दुरध्वनी क्रमांक – ०२० – २६१२२१३४ , २६१३२८०२ , २६०५०४२३ ३. व्हॉट्सअॅप क्रमांक पुणे – ७८७५३३३३३३ ४.सपंर्क साधण्याचे आवाहन राजेश बनसोडे , पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग , पुणे यांनी केले आहे .