पिंपरी चिंचवड,दि.२६ :- चाकण ग्रामीण रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्याणी लसीकरणासाठी 400 रुपयांची लाच घेताना पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून केली.ही कारवाई गुरुवारी (दि.26) दुपारी दोनच्या सुमारास चाकण ग्रामीण रुग्णालयात करण्यात आली. सचिन अरुण शिंदे (रा.रसे, ता. खेड) असे लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्याचे नाव आहे.चाकण ग्रामीण रुग्णालयात कोरोनाचे लसीकरण करण्यात येत आहे.लसीकरण केंद्रावर नागरिकांची मोठ्या प्रमाणत गर्दी होत आसल्याने.गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मागील काही दिवसांपासून कंत्राटी कर्मचारी सचिन शिंदे हा काम करत आहे.सध्या तो चाकण ग्रामीण रुग्णालयात अधिकृतपणे नेमणुकीस होता का हे अद्याप समजू शकले नाही.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रुग्णालयाच्या प्रवेश द्वारावर सचिन शिंदे याला तक्रारदार यांच्याकडून 400 रुपये घेताना सापळा लाऊन रंगेहाथ पकडले. सचिन शिंदे याच्यावर लाच लुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.