पुणे, दि.२७ :- पुणे शहरात दहीहंडी व गणेशोत्सव शासनाच्या नियमात राहून साजरा करावा, गेल्या वर्षीप्रमाणेच उत्सवासाठीची नियमावली या वर्षीही नियम कायम असून उत्सव शांततेत तसेच साधेपणाने करावेत, अस आवाहन भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी केले.कै. अभिजीत कदम क्रीडा संकुल भारती विद्यापीठ येथे भारती विद्यापीठ पोलिसांनी सर्व दहीहंडी व गणेश मंडळे यांचे अध्यक्ष, पदाधिकारी यांची बैठक घेतली, त्यावेळी कळसकर बोलत होते.यावेळी गुन्हे विभागाचे पोलीस निरीक्षक विजय पुराणिक व संगीता यादव, धनकवडी सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाचे उपअभियंता विजय वाघमोडे व के. एच. लखानी, महावितरण विभागाचे सहाय्यक अभियंता एस. बोरे तसेच नगरसेवक युवराज बेलदरे, सुधीर कोंढरे, डॉ. संजय जगताप, राजेंद्र देवकर, मनपा, वीज वितरण विभाग तसेच शांतता कमिटी सदस्य व गणेश मंडळाचे व दहीहंडी उत्सव समितीचे पदाधिकारी व मान्यवर सदस्य उपस्थित होते. विजय पुराणिक यांनी उपस्थितांचे आभार मानले.
हे आहेत नियम…
मूर्तीस्थापना मंदिरातच व्हावी.
मंडप ‘नियमातच उभारावा.
विसर्जन मिरवणुकीस परवानगी नाही.
भपकेबाज करणाऱ्यांवर कारवाई.
सोशल डिस्टंसिंग पालन करावे.
मंडपात गर्दी टाळावी.
धार्मिक कार्यक्रमांना संख्या बंधनकारक.
स्पीकर, डीजेला परवानगी नाही.