श्रीगोंदा,दि.०२ :- श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव ते श्रीगोंदा रोडचे काम मंजूर असूनही सुरू करत नसल्याने काम त्वरीत चालू करावे अन्यथा ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा उपविभागीय अभियंता ए.टी.अंपळकर (सार्वजनिक बांधकाम विभाग) यांना श्रीगोंदा तालुका युवक काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव प्रशांत भैय्या ओगले यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
या दिलेल्या निवेदनामध्ये असे म्हटले आहे की, सिद्धेटेक हे तिर्थक्षेत्र असल्याने श्रीगोंदा ते पेडगाव रस्त्यावरून भाविक मोठ्या प्रमाणावर भाविक ये-जा करत असतात. या रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या रस्त्यावर वाहतुक करणार्या वाहनधारकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यांची दुरूस्ती गेली अनेक वर्षापासुन झालेली नाही. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना साईट पट्टी व्यवस्थित नसल्याने अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे. सदरील निवेदनाचे उत्तर आम्हास १३ सप्टेंबरपर्यत नाही मिळाल्यास श्रीगोंदा तालुका युवक काँग्रेसच्या वतीने ठिय्या आंदोलन केले जाईल; असा इशारा महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव प्रशांत भैय्या ओगले यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
यावेळी श्रीगोंदा युवक काँग्रेसचे अध्यक्ष डाॅ.गोरख बायकर,वडाळी गावचे सरपंच महेश दरेकर, सोशल मीडिया युवक काँग्रेसचे अध्यक्ष शुभम लोणकर, लाला बारगुजे, रोहित चव्हाण, राहुल शिंदे आदी उपस्थित होते.
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे