पुणे, दि.०२ :- एन.सी.एल. कॉलनी ‘च्या आवारातील चंदनाची तब्बल 10 झाडे कापून चोरून नेण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार 21 ऑगस्ट रोजी घडला.चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कडक सुरक्षा व्यवस्था असलेल्या एनसीएल कॉलनीमध्ये चोरी झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.याप्रकरणी एनसीएलचे वरिष्ठ सुरक्षा अधिकारी पराग चिटणीस यांनी फिर्याद दिली आहे. पाषाण येथील एनसीएलला लागूनच एनसीएल कॉलनी आहे. या कॉलनीच्या आवारात चंदनाची झाडे आहेत. चोरट्यांनी या कॉलनीमध्ये असलेली चंदनाची दहा झाडे कापून चोरून नेली. तसेच कॉलनी शेजारी राहणारे राजीव फडतरे यांच्या घरा शेजारी असलेले चंदनाचे एक झाडही चोरट्यांनी कापून नेले. पुढील तपास पो.हवा.इरफान मोमीन करीत आहे