पुणे, दि.०२ :-पुणे रेल्वे स्टेशन येथून झेलम एक्सप्रेस गाडीने प्रवास करीत असताना दि ०८/०५/२००८ मध्ये गणेश मुन्नुलाल यादव (वय-२६) हा बेपत्ता झाला होता.याप्रकरणी त्याचा भाऊ सुशिलकुमार मन्नुलाल यादव (वय-२५ रा. मु.पो.हिनोतीया भोई ता. बरेला मध्यप्रदेश) याने लोहमार्ग पोलिसांकडे तक्रार केली होती. या तक्रारीवरुन लोहमार्ग पोलिसांनी बेपत्ता तरुणाचा शोध घेऊन १३ वर्षांनी त्याला कुटुंबाच्या स्वाधिन केले.पुणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मनुष्य मिसींगचा तपास करत असताना पोलिसांना गणेश यादव याची माहिती मिळाली.
गणेश यादव हा सुरत येथील आर्सन मित्तल अँड निप्पो स्टील प्लॅन्ट कन्व्हेअर या कंपनीत काम करत असल्याची माहिती मिळाली.
लोहमार्ग पोलिसांनी गणेश यादव याला ताब्यात घेऊन गुरुवारी (दि.2) त्याच्या कुटुंबाच्या स्वाधिन केले. हरवलेला मुलगा १३ वर्षानंतर आपल्या कुटुंबात परतल्याने कुटुंबाने पुणे लोहमार्ग पोलिसांचे आभार मानले.सदरची कामगिरी सदानंद गं . वायसे – पाटील , पोलीस अधीक्षक , लोहमार्ग पुणे , कविता नेरकर – पवार , अप्पर पोलीस अधीक्षक , लोहमार्ग पुणे , श्रीकांत क्षिरसागर उपविभागीय पोलीस अधिकारी , लोहमार्ग पुणे विभाग , मौला सय्यद वरिष्ठ पोलीस निरीक्षक , पुणे लोहमार्ग पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शणाखाली दिपक काळे सहा . पोलीस फौजदार , गजानन केंगार पोलीस हवालदार ब.क. २१ ९ , उदय चिले पोलीस नाईक ब क . २ ९ , संजिव हासे पोलीस शिपाई ब.क. १७७ यांनी केली आहे . सदर उत्कृष्ट कामगिरीबाबत सर्वांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे .