पिंपरी चिंचवड, दि.०५ :- चाकण परीसरात तळेगाव चौक नाणेकरवाडी येथे सुरु असलेल्या एका व्हिडिओ गेम जुगार अड्ड्यावर चाकण पोलिसांना छापा मारला. या कारवाईत पोलिसांनी 2 लाख 4 हजार 820 रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन 7 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.ही कारवाई शनिवारी (दि.4) दुपारी बारा वाजता नाणेकरवाडी येथील तळेगाव चौकात करण्यात आली.इलेक्ट्रीक पिंप पॉग मशिन मॅनेजर आप्पासाहेब मनोहर राऊत (वय-32 रा.गुरुप्रसाद सोसायटी, बालाजी नगर, मेदनकरवाडी ता. खेड), मशिन चालक राहुल नागनाथ काटे (वय-23 रा. गणेश नगर, मेदनकरवाडी, ता. खेड मुळ रा. सोनपेठ, जी. परभणी), जुगार खेळाणारा हिरालाल सुरेश पाटील (वय-38 रा. तळेगाव चौक, ता. खेड, मुळ रा. मंगरूळ जि. जळगाव), संजय सुदन सावंत (वय-45 रा. कडाचीवाडी, ता. खेड मुळ रा. तुंबनुक, पश्चिम बंगाल), पाहिजे असलेला आरोपी महालक्ष्मी व्हिडिओ गेम मालक मिठु जयराम ससाणे (रा. श्रीगोंदा, जि. अहमदनगर), जागा मालक बाळासाहेब हनुमंत भुजबळ (रा. चाकण, ता. खेड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार नितीन ज्ञानेश्वर गुंजाळ यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाणेकरवाडी येथील तळेगाव चौक परिसरातील एका किराणामालाच्या दुकाना शेजारी महालक्ष्मी व्हिडिओ गेम या ठिकाणी पैसे लावून जुगारखेळत व खेळवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे चाकण पोलिसांनी शनिवारी दुपारी बारा वाजता या जुगार अड्ड्यावर कारवाई केली. यामध्ये 2 लाख 4 हजार 820 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पुढील तपास चाकण पोलीस करीत आहेत.