जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार मंत्रालयात बैठक.
श्रीगोंदा,दि.०७:- श्रीगोंदा, पारनेर, कर्जत, करमाळा तालुक्यास वरदान ठरलेल्या डिंभे ते माणिकडोह बोगदा करण्यात यावा यासाठी बाळासाहेब नाहाटा हे आग्रही आहेत त्यांनी खा.शरदचंद्र पवार साहेब यांची भेट घेऊन त्यांच्या कानावर कैफियत मांडली.दरवर्षी पाण्याच्या टंचाई मुळे मोठा संघर्ष होत असतो,कुकडी डावा कालवा हा श्रीगोंदा कर्जत करमाळा पारनेर जुन्नर तालुक्यातील ९० हजार हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र ओलिताखाली आणतो.या कालव्याची लांबी २४९ किमी आहे.त्यासाठी २१ टी.एम सी पाण्याची तरतूद आहे. डिंभेच्या हक्काचे पाणी नगर सोलापूर जिल्ह्यातील शेतीसाठी मिळावे या १६ किमीचा बोगदा होणे अत्यंत महत्वाचे आहे.मागील सरकारच्या काळात ३०८ कोटी खर्च अपेक्षित असलेल्या प्रकल्पाची निविदा सुद्धा प्रसिद्ध करण्याची सरकारची तयारी सुरू झाली होती.३१ जानेवारी २०२० रोजी सी.डी.ओ ने, या प्रकल्पास मान्यता दिली होती मात्र राज्य तांत्रिक सल्लागार समितीने पुन्हा या प्रकल्पाचा प्रस्ताव सी डी ओ कडे पाठवला त्यामुळे आज रोजी पर्यंत हा प्रकल्प अडगळीत पडला आहे.श्रीगोंदा तालुक्यातील राजकीय पुढारी या विषयावर आजपर्यंत पूर्णतः अपयशी झाले आहेत. फक्त पत्रकबाजी करून पेपरला बातम्या छापून काही लोक ढोंग करत आहेत ही बाब या निमित्ताने अधोरेखित झाली.या प्रश्नांचे गांभीर्य पाहून पवार साहेब यांनी तातडीच्या सूचना दिल्या व जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तातडीची बैठक लावली. या बैठकीला दिलीप वळसे पाटील(गृहंमंत्री), आमदार निलेश लंके, आमदार अतुल बेनके, रोहित पवार बाबासाहेब भोस व बाळासाहेब नाहाटा यांना विशेष आमंत्रित करण्यात आले.
-चौकट-
डिंभे माणिकडोह बोगदा हा श्रीगोंदा तालुक्यातील शेतीसाठी अत्यंत महत्वाचा आहे त्यामुळे हा विषय मा.शरद पवार साहेब यांच्या कानावर घालून त्यांना विनंती केली त्यावर पवार साहेबांनी तातडीची बैठक लावून सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे. त्याबद्दल आम्ही पवार साहेबांचे विशेष ऋणी आहोत, अशी प्रतिक्रिया बाळासाहेब नाहाटा यांनी दिली.
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे