श्रीगोंदा, दि.०७ :-चोरीच्या गुन्ह्यातील रोहीदास सोमा थोरात रा.माळीनगर,ता.श्रीगोंदा (ह.रा.उस्मानाबाद) ता. जि. उस्मानाबाद यांस श्रीगोंदा पोलिसांनी जेरबंद केले आहे.सविस्तर वृत्त असे कि,बारामती सहकारी बँक शाखा काष्टी येथे हॉटेल जयश्री परमीट रुमचा भरणा करण्यासाठी रोख रक्कम १ लाख ६० हजार रुपये व तसेच फिर्यादीचे भाऊ राजेंद्र पाचपुते यांनी आर.के.कलेक्शन या कापड दुकानाच्या खरेदीसाठी ठेवलेले हॉटेल जयश्रीचे काऊंटरमधुन चोरीस गेलेली रोख रक्कम १० लाख असे एकुण ११ लाख ६०हजार रुपये रोख हे रोहीदास सोमा थोरात याने लबाडीच्या इराद्याने स्वतःच्या फायद्याकरीता चोरुन नेली आहे.अशी फिर्याद अमोल माणिक पाचपुते यांनी श्रीगोंदा पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं. ५८४/२०२१ भा.द.वि ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.त्यानुसार पो.नि.रामराव ढिकले यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली व तांत्रिक विश्लेषणावरुन हा गुन्हा रोहीदास सोमा थोरात रा. माळीनगर ता.श्रीगोंदा (ह.रा.उस्मानाबाद ता. जि. उस्मानाबाद) याने केला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानुसार गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी सपोनि तेजनकर व कर्मचारी यांना सुचना देवून रवाना केले व रोहीदास सोमा थोरात याला उस्मानाबाद येथुन ताब्यात घेउन त्याच्याकडे गुन्ह्याचे अनुशंगाने विचारपुस केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली देवुन गुन्ह्यातील चोरीस गेलेली रोख रक्कम ११ लाख ५० हजार रुपये व २५हजार रुपये किमतीची गुन्ह्यात वापरलेली एक काळ्या रंगाची बजाज डिस्कव्हर मोटर सायकल एम.एच.१६ ए.पी.१७२५ अशी एकुण ११ लाख ७५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा उघडकीस आणला आहे.सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव, यांचे मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, सपोनि दिलीप तेजनकर, सफौ. अंकुश ढवळे, पोना संतोष फलके, पोकॉ प्रकाश मांडगे, पोकॉ किरण बोराडे, पोकॉ अमोल कोतकर यांनी केली आहे.
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे