कर्जत,दि.०७ :- जालना येथून एक मोटारसायकल तसेच पाथर्डी, नगर मधून दोन मोबाईल चोरून आणणाऱ्या गुन्हेगारास मिरजगाव बसस्थानक परिसरात अटक करण्यात कर्जत पोलिसांना यश आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पो नि.चंद्रशेखर यादव यांना गोपनीय माहिती मिळाली कि कर्जत पोलीस स्टेशन हद्दीतील मिरजगाव बसस्थानकामध्ये एक अज्ञात संशियताकडे चोरीचे साहित्य आहे.अशी माहिती मिळाल्यानंतर पो.नि.चंद्रशेखर यादव यांनी पोलीस उपनिरीक्षक अमरजीत मोरे, पोहेकाँ बबन दहिफळे, पोना जितेंद्र सरोदे, पोकाँ गणेश काळाणे यांना या इसमास ताब्यात घेणेकामी रवाना केले.असता संशियत मिरजगाव बसस्थानक परिसरात मिळून आला.त्याला ताब्यात घेऊन त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव प्रमोद उर्फ नारायण काकासाहेब पठाडे, रा.जालना असे सांगितले या इसमाची झाडा झडती घेतली असता, त्याच्याकडे पाथर्डी मधील चोरी केलेला एक मोबाईल, नगर मधून चोरी केलेला एक मोबाईल आणि जालना या ठिकाणी चोरी एक मोटर सायकल असा १०हजार ५००रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला. सदर आरोपीविरुद्ध पोलीस शिपाई गणेश काळाणे यांच्या तक्रारीवरून कर्जत पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.या आरोपीला न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधिक्षक सौरभ कुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, कर्जत पोलिस स्टेशन, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील पाथर्डी पोलीस स्टेशन, पोलीस उपनिरीक्षक अमरजित मोरे, पोहेकाँ बबन दहिफळे पोना जितेंद्र सरोदे पोकाँ गणेश काळाणे, पोकाँ महादेव कोहक, चापोकाँ शकिल बेग यांनी केली आहे. सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोना जितेंद्र सरोदे हे करित आहेत.
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे