पुणे, दि.०८ :- पुणे शहरातील भाजपचे नगरसेवक धिरज घाटे यांच्या हत्येचा कट रचल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुणे शहर पोलिसांनी आरोपींना घेतले ताब्यात घेतले असल्याची माहिती समोर आली आहे.हे प्रकरण उघडकीस आल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात विकी उर्फ वितुल वामन क्षिरसागर, मनोज संभीजी पाटोळे (रा. सानेगुरूजी नगर आंबीलओढा कॉलनी) या दोघांसह त्यांच्या तीन ते चार साथीदारांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या पैकी तिघांना ताब्यात घेण्यात आले असून फिर्याद दिली आहे.