• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Sunday, June 1, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

कोविड काळात गणेशोत्सव कार्यकर्त्यांनी केलेले कार्य अभूतपूर्व पद्मविभूषण डॉ.रघुनाथ माशेलकर यांचे गौरवोद्गार

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
16/09/2021
in ठळक बातम्या, राज्य
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे,दि१६ : -कोविड काळात सर्व मंदिरे बंद होती, परंतु गणेशोत्सव कार्यकर्त्यांनी मानवसेवेची महामंदिरे उघडून समाजाची सेवा केली आहे. याकाळात शारीरिक अंतर असले तरी मानसिक अंतर या कार्यकर्त्यांनी आपल्या कामातून कमी केले. कोविड काळात गणेशोत्सव कार्यकर्त्यांनी केलेले कार्य प्रेरणादायी आणि अभूतपूर्व आहे. या कठीण काळात सर्वांनी एकत्रित येऊन काम केले, याचा अभिमान वाटतो. ही भावना अमेरिकेसारख्या देशात देखील दिसत नाही. त्यामुळे गणेशोत्सव कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाचे संकलन असलेले हे पुस्तक पुढची अनेक वर्षे समाजाला संदेश देण्याचे कार्य करेल, असे गौरवोद्गार ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ.रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केले.

जय गणेश व्यासपीठ या पुण्यातील गणेशोत्सव कार्यकर्त्यांच्या हक्काच्या व्यासपीठातर्फे शहरातील १०० गणेशोत्सव मंडळांनी कोविड काळात केलेल्या सामाजिक कार्याचे संकलन असलेल्या विघ्नहर्ता कार्यकर्ता या पुस्तकाचे प्रकाशन श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराशेजारील स्वागत मंडपात झाले. यावेळी ससून सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे, उपअधिष्ठाता डॉ.मुरलीधर तांबे, उद्योजक कृष्णकुमार गोयल, श्री कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट व जय गणेश व्यासपीठाचे सुनील रासने, महेश सूर्यवंशी, पुस्तकाचे संपादक पराग पोतदार, शिरीष मोहिते, पीयुष शाह आदी उपस्थित होते.

डॉ.रघुनाथ माशेलकर म्हणाले, कोविडची तिसरी लाट येणार की नाही, हे आपल्या हातात आहे. कोविडनंतर डेल्टा व्हेरिएंट सारख्या विषाणूंचे रुग्ण सापडत आहेत. मास्क बंदी उठविलेला इस्राईल सारखा देश देखील आज लॉकडाऊनमध्ये आहे. त्यामुळे आपले भविष्य आपल्या हातात आहे. प्रत्येकाने लस घेणे,मास्क लावणे आणि सुरक्षित अंतर राखणे यामुळे तिसरी लाट येण्यापासून रोखू शकतो. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने गणेशभक्तीच्या पुढे जाऊन अनेक सामाजिक कामे करण्यात येतात. जय गणेश ज्ञानवर्धन योजना, ससूनमधील अन्नछत्र, कुष्ठरोग्यांसाठी काम याशिवाय कोविड काळातील कार्य देखील वाखाणण्याजोगे आहे. गणेशोत्सव मंडळांना समाजातील काही घटक वेगळ्या दृष्टीकोनातून पाहतात. अनेकांना गणेशोत्सव मंडळाच्या सामाजिक कार्याची कल्पना नाही, असेही ते म्हणाले.

डॉ.विनायक काळे म्हणाले, श्रीमंत दगडशेठ गणपती ट्रस्टतर्फे कोविड काळात व त्यापूर्वीही निरंतरपणे रुग्णांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात येते. यामुळे हजारो रुग्णांना सकस आहार व चांगले उपचार आम्ही देऊ शकलो, हे गणेश मंडळाचे मोठे कार्य आहे. कोविड काळात अनेक सामाजिक व गणेशोत्सव कार्यकर्ते मदतीसाठी पुढे आल्याने आपण दोन्ही लाटांवर मात करु शकलो, असेही त्यांनी सांगितले. कृष्णकुमार गोयल म्हणाले, गणेशोत्सव कार्यकर्ता कसा असायला हवा, हे कोविड काळातील कार्यातून लक्षात येते. कोविडमुळे खूप काही गोष्टी शिकायला मिळायला. यापुढे कोविडसारखे कोणतेही संकट आल्यास त्यावर मात करायला आपण तयार आहोत.

महेश सूर्यवंशी म्हणाले, माणुसकीचा वसा हा गणेशोत्सवाचा गाभा आहे. हे गणेशोत्सव कार्यकर्त्यांनी तंतोतंत जपले आहे. लोकमान्य टिळकांचे विचार आचरणात आणत दोन वर्षे गणेशोत्सव मंडळांनी कार्य केले आहे. कोविड काळातील १०० गणेशोत्सव मंडळांचे सामाजिक कार्य संकलित व्हावे, याउद्देशाने पुस्तकाची निर्मीती करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. श्रीकांत शेटे यांनी मनोगत व्यक्त केले. पीयुष शाह यांनी आभार मानले.

Previous Post

प्रिय करायच्या मदतीने पोट च्या सहा वर्षाच्या मुलाचा खून

Next Post

राशीन मधील मोकाट जनावरांचा कर्जत पोलिसांनी केला बंदोबस्त

Next Post

राशीन मधील मोकाट जनावरांचा कर्जत पोलिसांनी केला बंदोबस्त

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist