कर्जत,दि.१६ :- राशीन गावातील काही नागरीकांनी तक्रारी दिल्या होत्या की, राशीन गावातील काही लोक आपली जनावरे ही मोकाटपणे रस्त्यावर सोडतात व येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना तसेच सर्व दुकानदार,भाजीविक्रेते,फळविक्रेते तसेच बाजारात साहित्य विक्री करण्यासाठी बसणारे लोक तसेच राशीन गावातील नागरिकांना या जनावरांचा त्रास होत होता. राशीन मधील नागरीकांनी पोलीस निरीक्षक यांना वेळोवेळी तक्रारी दाखल केल्या होत्या. त्याअनुषंगाने दिनांक १४ सप्टेंबर रोजी राञी ९ वा. चे सुमारास पो. नि चंद्रशेखर यादव, सपोनि सुरेश माने, पोसई शिरसाठ, पोहेकाँ तुळशीदास सातपुते, सागर म्हेत्रे, संपत शिंदे, देवा पळसे, मनोज लातुरकर तसेच स्थानिक नागरिकांच्या व दोन पंच राशीन येथे करमाळा चौक येथे ९:३० वा चे सुमारास पोहोचले असता त्यावेळी सार्वजनिक ठिकाणी जनावरे मोकाटपणे रस्त्यावर फिरताना व त्यांना त्यांचे मालकांनी निर्दयपणे वागणुक देवुन त्यांच्या चा-याची, पाण्याची व निवा-याची कसल्याही प्रकारची सोय न करताना मिळुन आली आहेत.कर्जत पोलिसांनी राशीन मधील मोकाट जनावरे पकडण्याची कारवाई हाती घेतली असून तब्बल एकूण १२ जनावरे पकडली आहेत.१ लाख २६ हजार रुपये किमतीची जनावरे अनोळखी मालकांनी सार्वजनिक रस्त्यावर त्यांच्या जनावरांना निर्दयपणे वागणुक देवुन त्यांच्या चारा, पाणी व निवा-याची कसल्याही प्रकारची सोय न करता त्या जनावरांची उपासमारी होवुन ते तहानेने व्याकुळ होतील अशा प्रकारे मोकाटपणे सार्वजनिक रस्त्यावर सोडलेल्या अवस्थेत मिळाल्याने त्याचा दोन पंचासमक्ष पो.स.ई शिरसाठ यांनी जनावरे ताब्यात घेतली. कर्जत पोलीस ठाण्यात जनावरांच्या मालकांविरुद्ध प्राण्यांना निर्दयतेने वागवण्याचा कायदा कलम 11 तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 106, 118, 119 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार तुळशीराम सातपुते करत आहेत.
सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक मनोज पाटील अहमदनगर जिल्हा,अपर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल , उप विभागीय पोलीस अधिकारी कर्जत भाग आण्णासाहेब जाधव यांचे मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षीक सुरेश माने,पोसई शिरसाठ, पोहेकाँ तुळशीदास सातपुते, सागर म्हेत्रे,संपत शिंदे, देवा पळसे, मनोज लातुरकर यांनी केली.
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे