कर्जत,दि.२१ :-तालुक्यातील लोणीमसदपूर येथील सचिन विठ्ठल आडागळे, वय २७ वर्ष,याच्याविरुद्ध कर्जत पोलिस स्टेशन, हडपसर पोलीस स्टेशन पुणे येथे शरीराविरुद्ध व मालमत्तेबद्दल विविध स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल होते.सचिन आडागळे हा आरोपी लोणी मसदपुर येथील महिला व गावकऱ्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करत होता.अश्लील भाषेत नागरिकांना शिवीगाळ करून त्याचे व्हिडिओ बनवून तो स्वतः व्हायरल करत होता.या आरोपीच्या अश्लिल भाषेतील शिवीगाळीला नागरिक त्रस्त झाले होते.त्यानंतर नागरिकांनी कर्जत पोलीस स्टेशन येथे धाव घेऊन तक्रार दाखल केली होती.
त्यानुसार कर्जत पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेऊन पुढील होणारे गंभीर गुन्हे टाळण्यासाठी नमूद गुन्हेगारास कर्जत पोलिसांनी अटक केले आणि त्याचे विरुद्ध सीआरपीसी कलम 151 (1)(3)प्रमाणे प्रतिबंधक प्रस्ताव मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कर्जत यांच्याकडे सादर केला. मा. न्यायाधीश पळसापुरे यांनी नमूद आरोपीस आठ दिवस न्यायालयीन कोठडीत स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला आहे.
सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक मनोज पाटील,
अप्पर पोलीस अधीक्षक,सौरभ अग्रवाल,
उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव,
यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव,
सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश माने, पोलीस नाईक पांडुरंग भांडवलकर, चालक नितीन नरोटे होमगार्ड अशोक धांडे यांनी केली आहे.
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे