कर्जत,दि२८:- :-तालुक्यात कोरोना विषाणूचा वाढत चाललेला प्रादुर्भाव लक्षात घेता पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी स्वतः रस्त्यावर उतरून पोलीस कर्मचाऱ्यांना बरोबर घेऊन कर्जत शहारामध्ये विना मास्क फिरणारे व सोशल डिस्टंसिंग चे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. काही लोकांना दंडात्मक कारवाई करण्यात आली. कर्जत शहरामध्ये सोमवार असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. परंतु काही नागरिक कारवाईबाबत नाराजी व्यक्त करतात, काहींना कारवाईचा राग येतो, किती रुपये पावती आहे सांगा असे म्हणून पैसे मोजू लागतात.अशा नागरिकांना कर्जत पोलिसांनी स्वतः जवळचे मास्क लावले आणि त्यांना 2 तास पोलिसांना मदत करण्यासाठी घेतले व नंतर अनुभव सांगण्यासाठी कळविले. काही वेळ पोलिसांसोबत काम केल्यानंतर नागरिकांनी पोलिसांच्या कामाबाबत योग्य ती जाणीव झाली आणि यापुढे अशा प्रकारे पोलीस कारवाईला चुकीच्या पद्धतीने व्यक्त होणार नाही अशा भावना व्यक्त केल्या. नागरिकांना समजले कि पोलिस कारवाईसाठी व कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढू नये या करीता किती त्रास घेतात.
कर्जत पोलिसांनी सप्टेंबर महिन्यात विना मास्कच्या 74, सोशल डिस्टंसिंग 483, गुटखा खाऊन थुंकणे बाबत कोटपा च्या 20 व मोटार वाहन कायदा अंतर्गत 230 एवढ्या कारवाया केल्या आहेत.
सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक,मनोज पाटील अहमदनगर जिल्हा,अपर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल , उप विभागीय पोलीस अधिकारी कर्जत भाग आण्णासाहेब जाधव यांचे मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस अंमलदार बाळासाहेब यादव, गोवर्धन कदम, बळीराम काकडे, भारत डांगोरे, शकील बेग, नितीन नरोटे यांनी केली.
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे