मुंबई,दि०७: – मुंबई पोलीस दलाच्या अमलीपदार्थविरोधी विभागाच्या आझाद मैदान पथकाने कौतुकास्पद कारवाई केली. राजस्थानमधून मुंबईत ड्रग्ज तस्करीचा पर्दाफाश केला. सदर कावाई पोलीस निरीक्षक राजेंद्र दहिफळे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी केली. या कारवाईत पोलिसांनी तब्बल १५ कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त केले. या कारवाईमुळे मोठे रॅकेट उजेडात येण्याची शक्यता असून त्या अनुषंगाने तपास सुरू असल्याचे अमलीपदार्थविरोधी पथकाचे उपायुक्त दत्ता नलावडे यांनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई अमलीपदार्थ मुक्त करण्यासाठी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, पोलीस सह आयुक्त (गुन्हे) मिलिंद भारंबे यांनी तस्क यांचे जाळे मुळापासून तोडण्याचे आदेश दिले. त्यानुसार अमलीपदार्थविरोधी विभागाचे उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पथके तस्कºयांच्या अटकेसाठी आपापल्या परीने मोहीम राबवू लागले. आझाद मैदान अमलीपदार्थविरोधी विभागाची विशेष मोहीम सुरू असताना राजस्थानमधील हेरॉईनचे मोठ्या प्रमाणात होणारे उत्पादन प्रतापगड आणि चित्तोडगड जिल्ह्यातून रेल्वे व बसमार्गे मुंबईत आणले जात असल्याची माहिती आझाद मैदान अमलीपदार्थविरोधी पथकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक राजेंद्र दहिफळे यांना गोपनीय माहिती मिळाली . त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी डोंगरी परिसरातील एका लॉजवर छापा टाकला. तेथून दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी नावे हकीम गुल खान (वय ५६) आणि जीवनलाल भेरूलाल मिणा (वय २१) अशी या आरोपींची नावे आहेत. या कारवाईत पोलिसांनी त्यांच्याकडून हकीमकडून ४ किलो ५०० ग्रॅम तर मिणा याच्याकडून ५०० ग्रॅम हेरॉईन जप्त करण्यात आले. या हेरॉईनची किंमत १५ कोटी रुपये असल्याचे तपासादरम्यान निष्पन्न झाले. या प्रकरणी आझाद मैदान अमलीपदार्थविरोधी पथकाने (गु. र. क्र. ८८/२०२१) एनडीपीएस कायदा कलम ८(क) सह कलम २१(क), २९ नुसार गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक केली.सदर कारवाई पोलीस सह आयुक्त (गुन्हे) मिलिंद भारंबे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) विरेश प्रभू, अमलीपदार्थविरोधी पथकाचे उपायुक्त दत्ता नलावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त (अतिरिक्त कार्यभार) पोलीस निरीक्षक संदीप काळे, आझाद मैदान अमलीपदार्थविरोधी पथकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक राजेंद्र दहिफळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धराम म्हेत्रे, पोलीस उपनिरीक्षक मानसिंग काळे, पोलीस उपनिरीक्षक अमित देवकर, हवालदार मुजावर, पोलीस नाईक चव्हाण, पोलीस अंमलदार ढाणे, पोलीस अंमलदार निंबाळकर आदी पोलीस पथकाने केली असून या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मानसिंग काळे करत आहेत.
जानेवारी २०२१पासून ८६.५० कोटींचे ड्रग्स जप्त
अमलीपदार्थविरोधी पथकांनी जानेवारी २०२१ महिन्यापासून ८६ कोटी ५० लाखांचे ३ हजार ८१३ किलो ग्रॅम ड्रग्ज जप्त केले आहे. या एकूण कारवायांमध्ये अमलीपदार्थविरोधी पथकाने ८८ गुन्हे दाखल करून Þ१२९ तस्कºयांना अटक केली आहे. तसेच मुंबईतील पोलीस ठाण्याच्या स्तरावर ३ हजार २४५ गुन्हे दाखल करुन ३ हजार ४४६ आरोपींना अटक करून २६ कोटी ३४ लाखांचे १ हजार २४३ किलो ग्रॅम ड्रग्ज जप्त केले आहे.