श्रीगोंदा,दि.०७ :-राज्याला आता कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचा धोका असल्याचा अंदाज तज्ञ व्यक्त करत आहेत. सरकारने देखील तिसऱ्या लाटेचा अंदाज व्यक्त करत या लाटेशी दोन हात करता यावेत यासाठी तयारी सुरू केली आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरते आहे, असे वाटत असताना तिसरी लाट नगर जिल्ह्याच्या दिशेने रोरावत निघाली आहे. दररोज वाढणारी रूग्णसंख्या काळजी वाढवणारी आहे.
करोना रुग्णांची संख्या राज्यात कमी झाली असून कडक लॉकडाऊन व कडक निर्बंध आता या पुढे लावण्यात येऊ नये, लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय नसून या लॉकडऊन मुळे छोट्या छोट्या व्यावसायिकांना आता उपासमारीची वेळ आली आहे.मागच्या वर्षीच्या कडक लॉकडऊन नंतर आता पुन्हा काष्टी मध्ये ४ ऑक्टोबर ते १३ ऑक्टोबर असे १० दिवस लॉकडऊन आहे. व लॉकडऊन असला तरी विद्युत बिल, मालमत्ता कर , गाळे भाडे, GST, बँकेच्या कर्जाचे हफ्ते हे बिल मात्र शासनाला देणे आहे. त्यामुळे सर्व काळजी घेऊन आम्ही व्यवसाय सुरू करू अशी छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांची धारणा आहे. इतर अत्यावश्यक व्यावसायका प्रमाणे बाकीच्या ही व्यवसायकांना आपले दुकाने पूर्ववत सुरू करण्याची परवानगी मिळावी.मागील वर्षी ही छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांची आर्थिक घडी पूर्ण कोलमडली असताना हा १० दिवसांचा लॉकडऊन पुन्हा लावण्यात आला असल्याने कोरोना पेक्षा उपासमारीची वेळ आली आहे. २ वर्ष लॉकडऊन करून आता छोटा व्यापारी पुन्हा उभा राहण्याची शक्यता फार कमी दिसत आहे. व्यापार बंद करून दुसरा पर्याय शोधावा लागेल.शासनाने लवकरात लवकर सर्व छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांचे युद्ध पातळीवर लसीकरण करावे व आरोग्य यंत्रणा उभारण्यास शासनाने भर द्यावा, केंद्र व राज्यसरकारच्या लसीकरणाच्या कुरघोडी राजकारणापाई छोट छोटे व्यावसायिक देशोधडीला लागले आहेत.तिसऱ्या लाटेच्या नावाखाली करण्यात येणारा लॉकडऊन आता परवडणारा नाही,तरी शासनाने वरील सर्व गोष्टीचा गांभीर्याने विचार करावा असे निवेदना व्दारे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांना व्यापारी असोसिएशनच्या वतीने निवेदन देण्यात आले होते पण ऐन सणासुदीच्या काळात लॉकडाऊन झाल्यामुळे सामान्य नागरिकांची गैरसोय झाली आहे.
यामुळे आज रोजी सकाळी दहाच्या सुमारास श्रीगोंदा तहसील कार्यालया समोर काष्टी ग्रामस्थासह छोटे मोठे दुकानदार उपोषणाला बसले आहेत.प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांनी उपोषणकर्त्यांना 13 तारखेपर्यंत सहकार्य करा त्यानंतर नगरपालिकेचे नियम लावण्यासाठी वरीष्ठ पातळीवर चर्चा करून प्रयत्न करू.यावेळी तालुक्याचे आमदार बबनराव पाचपुते, माजी आमदार राहुल जगताप,जिल्हा परिषद सदस्या अनुराधा नागवडे,विठ्ठलराव काकडे,कैलास पाचपुते, वैभव पाचपुते, सरपंच सुनिल पाचपुते,बंडूशेठ जगताप,राकेश पाचपुते संजय काळे,किशोर भोगावत,महेशशेठ कटारिया, अनिल शेलार,यांच्यासह व्यापारी,व्यावसायिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते.
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे