पुणे,दि.१९ :- पुणे शहरात करोना काळात पुणे महानगरपालिकेतील महिला भगिनींनी आपल्या जीवाची परवा न करता पुणेकर नागरिकांसाठी आपले काम चोख पार पाडले. त्यांच्या या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यातसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे शहर व ‘मी द चेंज फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जागर स्त्री शक्तीचा’ कार्यक्रमांतर्गत पुणे महानगरपालिकेतील महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष रणजित शिरोळे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी सुहास निम्हण,अंजनेय साठे, विनायक कोतकर, जयश्री मोरे, यांच्या सह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. परीक्षित शिरोळे, अनिकेत ढगे, वैभव कदम, लावण्या शिंदे, श्रुती पोलकमवार, मुमताज शेख, सविता जगधने, दीप्ती बेगमपुरे, काजल दातखिळे, यांनी कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाश धोत्रे यांनी केले.