पुणे,दि.१९ :- बेकायदा सावकारी करणाऱ्या एका खासगी व्यवसायिकास पुणे शहर पोलिसांनी अटक केली आहे. कैलास उर्फ अप्पा बाबुराव बिबवे (रा.महेश सोसायटी, बिबवेवाडी पुणे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. ही कारवाई खंडणी विरोधी पथकाने केली आहे. याप्रकरणी बिबवेविराेधात सावकारी अधिनियम कलमानुसार गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.याबाबत सविस्तर वृत असे की, फिर्यादीदाराला पैशांची आवश्यकता होती. फिर्यादीने कैलास बिबवे याच्यांकडून मार्च 2018 मध्ये 25 हजार रुपये घेतले होते. बिबवेने त्याला 10 टक्के व्याजदराने पैसे दिले होते. फिर्यादी व्यावसायिकाने त्याला दरमहा व्याज देखील दिले होते. त्यानंतर बिबवे हे फिर्यादीदाराकडे आणखी पैसे देण्याचे मागणी करत होता. मूळ मुद्दल तसेच व्याजाची परतफेड केल्यानंतरही बिबवे धमकावत होता. तसेच दमदाटी देत होता.
दरम्यान, यानंतर फिर्यादी व्यावसायिक या त्रासाला कंटाळून अखेर त्याने पुणे शहर खंडणी विरोधी पथक पोलिसांत धाव घेतली.आणि बिबवेविरोधात तक्रार दाखल केली आहे. यानंतर खंडणी विरोधी पथकाने कैलास बिबवे यास ताब्यात घेतलं आहे.दरम्यान, सदरची कारवाई खंडणी विरोधी पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण, संपत ओैचरे , सुरेंद्र जगदाळे, शैलेश सुर्वे विनोद साळुंके , विजय गुरव , राहुल उत्तरकर यांनी केली आहे.