पुणे, दि२१ :- शिरूर पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे पिंपरखेड तालुका शिरूर जिल्हा पुणे या गावांमधील बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेत आज दिनांक २१/१०/२०२१ रोजी दुपारी १३:३० वाजण्याच्या सुमारास चार अनोळखी चोरट्यांनी बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून दरोडा टाकण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.पिंपरखेड येथील महाराष्ट्र बँकेवर भरदिवसा दुपारी 1.30 च्या सुमारास पाच ते सहा जणांच्या टोळीने रिवॉल्वर लावून 2 कोटी रूपयांचे सोने आणि 31 लाख रूपये रक्कम लंपास केल्याची घटना घडली आहे.
ही संपूर्ण घटना बँकेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडीओ आता समोर आला आहे. या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे .
याबाबत मिळालेली माहिती अशी की, पिंपरखेड येथे बँक ऑफ
महाराष्ट्राची शाखा असून येथे व्यवस्थापक मोहित चव्हाण रोखपाल सागर पानमंद व इतर दोन कर्मचारी बँकेमध्ये कामकाज करीत होते. त्यावेळी येथे दहा-बारा शेतकरी ग्राहक देखील उपस्थित होता. अचानक दिड वाजेच्या दरम्यान सफेद कलरच्या सियाज कारमधुन आलेले पाच जन गाडीतुन उतरुन बॅकेत शिरले .एक जण दरवाजा मध्ये थांबला तर चौघे आत केबिनमधे शिरले . त्यांनी मॅनेजर व रोखपाल यांना पिस्तुलचा धाक दाखवीत जीवे मारण्याची धमकी देत लॉकर च्या चाव्या घेतल्या. त्यानंतर तेथील सुमारे दोन कोटी रुपयांचे सोने व 31 लाख रुपये रोख असा दोन कोटी 31 लाख रुपयांचा ऐवज चोरांनी घेऊन सफेद रंगाच्या कार गाडी मधून पलायन केले. या गाडीवर प्रेस चा मोठा बोर्ड लावण्यात आलेला होता.पिंपरखेड पासुन शिरूर पोलिस स्टेशन सुमारे 45 किमी अंतरावर आहे घटना समजताच पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत घटनास्थळी हजर झाले . पुणे व नगर जिल्ह्यांची नाका बंदी करण्यांची सुचना देण्यात आली असुन पोलिस पुढील तपास करीत आहेत