पुणे, दि२२ :- लोणीकाळभोर परिसरातील उरूळी कांचन येथील तळवेडे चौकात ही फायरिंगची घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.या गोळीबाराच्या घटनेमध्ये 3 जण अतिशय गंभीर जखमी झाल्याचं वृत्त समजतंय. त्यामधील दोघांची प्रकृती अतिशय म्हणजे अत्यंत गंभीर असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. अप्पा लोंढे व त्याच्या विरूध्द असलेल्या एकाने ही फायरिंग झाल्याची माहिती समोर आली आहे.
संतोष जगताप याच्यावर देखील फायरिंग झाली असून त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांशी याबाबत संपर्क साधला असता वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली असल्याचं सांगण्यात आलं आहे. वाळूची ठेकेदारी आणि इतर वादातून हे टोळी युध्द भडकल्याची चर्चा सध्या आहे. भरदिवसा पुण्यातील लोणीकाळभोर परिसरात ही घटना घडल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.लोणी काळभोर पोलिस ठाण्यातील तसेच शेजारील पोलिस
ठाण्यातील वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी देखील घटनास्थळी रवाना झाले आहेत. पोलिस उपायुक्त नम्रता पाटील या देखील घटनास्थळी गेल्या आहेत. टोळीयुध्दातून फायरिंग झाल्याने परिसरात तणाव निर्माण झाला आहे. नेमकी गोळीबार कोणत्या कारणामुळं झाला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र, वाळुची ठेकेदारी आणि इतर काही कारणामुळे तसेच पुर्ववैमनस्यातून हा गोळीबार झाल्याचं सुत्रांनी सांगितलं आहे. गोळीबारात तिघे गंभीर जखमील झाले आहेत. त्यामध्ये संतोष जगताप आणि त्याचा साथीदार तसेच विरूध्द टोळीतील एकजण गंभीर जखमी झाला आहे.जखमी झालेल्यांना नजीकच्या हॉस्पीटलमध्ये रवाना करण्यात आलं आहे. अति वरिष्ठ पोलिस अधिकारी देखील घटनास्थळी रवाना झाले आहेत.पुण्यात टोळीयुध्द भडकल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.संतोष जगताप हा राहू येथील रहिवाशी आहे. त्याच्यावर गोळीबार झाला आहे.त्याला विश्वराज रूग्णालयातून ससून रूग्णालयात दाखल करण्यात येत असल्याची माहिती लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिली आहे.