श्रीगोंदा,दि२२ :- यवत पोलीस ठाण्यात दरोड्याची तक्रार आल्यानंतर अवघ्या बारा तासात श्रीगोंदा पोलिसांनी तांदळी दुमाला गावचे शिवारात कोंबिग ऑपरेशन राबवून चार आरोपींना अटक केली आहे.
विक्रम उर्फ बापू सर्जेराव भैलुमे रा.आढळगाव, ता. श्रीगोंदा,अजय उर्फ साजन मोहन काळे रा.तांदळी दुमाला ता श्रीगोंदा,सौरभ शिका चव्हाण रा.राहुरी,निलेश रवींद्र काळे, रा.गटेवाडी ता.पारनेर अशी अटक केलेल्या आरोपीचे नावे आहेत.या चार आरोपींना ताब्यात घेऊन त्याना यवत पो.स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.सविस्तर वृत्त असे कि,सायराबानो नुरोद्दीन शेख रा.पाटस ता.दौंड यांना चाकूचा धाक दाखवून ७७ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले होते.पोलिसांनी अहोरात्र परिश्रम घेऊन दौंड तालुक्यात सर्वांत मोठा समजल्या जाणाऱ्या या चोरीचा यशस्वी तपास लावला व अवघ्या बारा तासांत या प्रकरणी चार आरोपींना गजाआड करण्यात श्रीगोंदा पोलीसांनी यश मिळविले. या गुन्ह्याच्या तपास कामी मनोज पाटील पोलीस अधीक्षक अहमदनगर, सौरभ अग्रवाल अपर पोलिस अधिक्षक अहमदनगर, आण्णासाहेब जाधव उपविभागीय पोलिस अधिकारी कर्जत यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामराव ढिकले,सपोनि दिलीप तेजनकर,स फौ अंकुश ढवळे,पो.ना गोकुळ इंगवले,पो.कॉ प्रकाश मांडगे,पो.कॉ किरण बोराडे,पो.कॉ दादासाहेब टाके, पो.कॉ अमोल कोतकर व यवत पोलीस स्टेशन चे स फौ जगताप, पो.हे.कॉ गायकवाड, पो.कॉ जगताप यांनी केली आहे.