पुणे, दि.२५ :-नोव्हेंबर 2021 हा सणांचा महिना आसल्याने. धनत्रयोदशी, दिवाळी, भाईदूज, छठ पूजा, गुरुनानक जयंती अशा अनेक सुट्ट्या या महिन्यात पडणार आहेत.नोव्हेंबर 2021 मध्ये बँका 17 दिवस बंद राहतील केंद्रीय बँक आरबीआयने निश्चित केलेल्या काही सुट्ट्या प्रादेशिक असल्यामुळे देशभरातील सर्व बँका 17 दिवस बंद राहणार नाहीत.म्हणजेच काही राज्यांमध्ये काही दिवस बँका बंद राहतील, परंतु इतर राज्यांमध्ये सर्व बँकिंग कामकाज नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे. पुढील महिन्यात, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स कायद्यांतर्गत, RBI ने 1, 3, 4, 5, 6, 10, 11, 12, 19, 22 आणि 23 नोव्हेंबर रोजी सुट्टी जाहीर केली आहे. याशिवाय, चार रविवार आणि महिन्यातील दुसरा आणि चौथा शनिवार सुटी आहे.नोव्हेंबर 2021 मध्ये बँकेच्या सुट्ट्या
1 नोव्हेंबर – कन्नड राज्योत्सव / कुट – बेंगळुरू आणि इंफालमध्ये बँका बंद
3 नोव्हेंबर – नरक चतुर्दशी – बेंगळुरूमध्ये बँका बंद
नोव्हेंबर 4 – दिवाळी अमावस्या (लक्ष्मी पूजा) / दीपावली / काली पूजा – बेंगळुरू वगळता सर्व राज्यांत बँका बंद
5 नोव्हेंबर – दिवाळी (बळी प्रतिपदा) / विक्रम संवत नवीन वर्ष / गोवर्धन पूजा – अहमदाबाद, बेलापूर, बंगलोर, डेहराडून, गंगटोक, जयपूर, कानपूर, लखनौ, मुंबई आणि नागपूर येथे बँका बंद
6 नोव्हेंबर – भाई दूज / चित्रगुप्त जयंती / लक्ष्मी पूजा / दीपावली / निंगोल चकोबा – गंगटोक, इंफाळ, कानपूर, लखनौ आणि शिमला येथे बँका बंद
7 नोव्हेंबर – रविवार (साप्ताहिक सुट्टी)
10 नोव्हेंबर – छठ पूजा / सूर्य षष्ठी दाला छठ – पाटणा आणि रांची मध्ये बँका बंद
11 नोव्हेंबर – पटनामध्ये छठ पूजा – बँक बंद
12 नोव्हेंबर – वांगळा उत्सव – शिलाँगमध्ये बँका बंद
13 नोव्हेंबर – शनिवार (महिन्याचा दुसरा शनिवार)
14 नोव्हेंबर – रविवार (साप्ताहिक सुट्टी)
19 नोव्हेंबर – गुरु नानक जयंती / कार्तिक पौर्णिमा – आयझॉल, बेलापूर, भोपाळ, चंदीगड, देहरादून, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कानपूर, कोलकाता, लखनौ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, रायपूर, रांची, शिमला, श्रीनगर येथे बँका बंद
21 नोव्हेंबर – रविवार (साप्ताहिक सुट्टी)
22 नोव्हेंबर – कनकदास जयंती – बेंगळुरूमध्ये बँका बंद
23 नोव्हेंबर – सेंग कुट्सनेम – शिलाँगमध्ये बँका बंद
27 नोव्हेंबर – शनिवार (महिन्याचा चौथा शनिवार)
28 नोव्हेंबर – रविवार (साप्ताहिक सुट्टी)