दौंड,दि२५ :- दौंड परिसरात इलेक्ट्रॉनिक ट्रान्सफॉर्मर चोरी
दौड पोलीस ठाणे हद्दीत होणाऱ्या ईलेक्ट्रीक ट्रान्सफॉर्मर चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करून ते उघडकीस आणण्यात दौंड पोलिसांना यश आले आहे.या पुणे ग्रामीण दौंड गुन्हे अन्वेषण (डी.बी) पथक प्रमुख शहाजी गोसावी व त्यांच्या टीमला सूचना देण्यात आल्या होत्या, दरम्यान हा तपास करत असतांना दौंड डी.बी पथकाचे हाती काही पुरावे लागले होते. त्या पुराव्यांचे आधारे डी.बी पथकाने सखोल तपास केला असता, त्यांना काही संशयित आरोपींचे नावे समजली .त्या नंतर डी बी पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे शोध घेऊन पाच जणांना अटक केली आहे. चेतन पिंपळे रा. तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर, मयूर उर्फ बाब्या काळे रा. तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर, विनय भोसले रा. केडगाव, ता. दौंड, संतोष भोसले रा. केडगाव, ता. दौंड, अजय सुरडकर रा. तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींना ताब्यात घेऊन कोर्टासमोर हजर केले असता कोर्टाने त्यांना ५ दिवसाची पोलीस कस्टडी सुनावली आहे. दरम्यान त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी दौंड पोलीस ठाणे हद्दीतील ईलेक्ट्रीक ट्रान्सफॉर्मर मधील कॉपर वायर चोरलेल्या सर्व गुन्ह्यांची कबुली त्यांनी दिली आहे.आरोपींकडून चोरी केलेला मुद्देमाल व चोरीसाठी वापरलेले एक पीक अप वाहन असे मिळून एकूण आठ लाख २० हजार रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदर कारवाई डॉ. अभिनव देशमुख, पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पो अधिकारी राहुल धस व पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि राठोड, डी.बी पथकाचे पोलीस उप निरीक्षक शहाजी गोसावी, स.फौ. भाकरे, पो हवा सुभाष राऊत, पो.ना अमोल गवळी, पो.ना. आदेश राऊत, पो.ना. विशाल जावळे, पो. ना रणजित निकम, पो.ना दुके, पो.कॉ अमोल देवकाते यांनी केली असून अधिक तपास स.फौ. कुंभार करीत आहेत.