पुणे ग्रामीण दि.२७ : -राजगड पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण येथे गुन्हा दाखल होता व गुन्ह्य दिनांक 10/10/2021 रोजी 00.45 ते 3.00 वा चे सुमारास कोल्हापूर ते खेड शिवापूर टोल नाका दरम्यान प्रवास करणाऱ्या व्यापारी हे प्रवास करीत असताना कर्नाटक पासून प्रवास करणारे प्रवासी सीट नंबर 23, 24 ,व 25 वरून प्रवास करणारे तीन अनोळखी इसमाने प्रवास करणाऱ्या व्यापारीची सोन्याचे दागिने व रोख रक्कम असलेली 1) 81,24,000/- कि चे 2,110 ग्रॅम वजनाचे 18 कॅरेट चे सोन्याचे वेगवेगळे दागिने2) 18,00,000/- रोख रक्कम की सुत्यात 2,000,500,100 रुपये दराच्या भारतीय चलनी नोटा एकूण किंमत रुपये =99,24,000/- वरील वर्णनाचा व किमतीचा मुद्देमाल असलेली खाकी रंगाची भरलेली बॅग चोरून चोरट्यांनी पोबारा केला होता व राजगड पोलिसांनी तपासाची वेगाने चक्रे फिरवून यातील दोन चोरट्यांना अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत जेरबंद केले असून एक किलो सोने जप्त केले आहे. अवघ्या पंधरा दिवसात कर्जत व राजगड पोलिसांनी गुन्ह्याचा छडा लावून धडाकेबाज कारवाई केल्याने पोलिसांचे कौतुक होत
आहे.मारुती राजाराम पिटेकर वय ४५ रा. माळगी ( ता. कर्जत, जि. अहमदनगर) व अनंता लक्ष्मण धांडे वय ४०, रा. वालवड ( ता. कर्जत, जि. अहमदनगर ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून त्यांना ता. माळगी, जि. अहमदनगर येथून पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास राजगड आणि कर्जत पोलिसांनी संयुक्त कारवाई करून पकडले असून कोल्हापूर ते खेडशिवापूर टोलनाक्याच्या दरम्यान महामार्गावर हुबळीवरून मुंबईकडे जाणारी व्हि. आर.एल ट्रॅव्हल्सची बस क्रमांक KA/25/ AA. 5943 या बसमधून दि. 10 ऑक्टोंबर रोजी मध्यरात्रीच्या चोरट्यांनी बसचालकाला इमर्जन्सी असल्याचे कारण सांगत बस थांबवून कॅश व सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारून पोबारा केला होता. याप्रकरणी व्यापारी कमलेश सुकनराज राठोड ( रा. भांडुप पश्चिम मुंबई ) यांनी राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील तसेच कर्जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक चंद्रशेखर यादव, सपोनि सतीश गावित, सुरेश माने, पोलीस जवान शाम जाधव, जालिंदर पाचपुते, सुनील खैरे, गोवर्धन कदम आणि मनोजकुमार नवसरे, उपनिरीक्षक लोणकर, पोलीस हवालदार अजित माने, भगीरथ घुले, महेश खरात, संतोष तोडकर, नाना मदने, योगेश राजीवडे, सोमनाथ जाधव, मारणे राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील, सपोनि प्रवीण पोरे व राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस जवान असे पहाटे 5 वाजता मोठ्या शिताफीने माळंगी, तालुका कर्जत येथून संयुक्त कारवाई करुन यातील आरोपी यांना ताब्यात घेवून कर्जत पोलीस ठाण्यात आणले. यातील आरोपी यांना कसून विचारपूस करुन गुन्ह्यातील जवळपास 1 किलो सोन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि प्रवीण पोरे करत आहेत. पुणे पोलीस सदर प्रकरणात खोलवर तपास करून आणखी कोण कोण सामील आहेत याबाबत सखोल तपास करून आरोपी अटक करणार आहेत. सदर आरोपींवर कर्नाटक तसेच महाराष्ट्रातील कराड शहर, नंदुरबार व इतर ठिकाणी गुन्हे दाखल आहेत.यशस्वी कारवाई करून आरोपींना जेरबंद केले.राजगड पोलिसांनी तांत्रिक बाबी वरून आरोपी ता. माळगी, जि. अहमदनगर येथे असल्याची तांत्रिक बाबी वरून समजताच राजगड पोलिसांच्या पथकाने सलग तीन ते चार दिवस त्या परिसरात दोन पथके तैनात केले होते. राजगड आणि कर्जत पोलिसांनी रचलेला सापळ्यात दोन आरोपी जेरबंद झाले. यातील ३७ लाख ७२ हजार रुपये किंमतीचे सोने मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. आरोपींवर कर्नाटक तसेच महाराष्ट्रातील कराड शहर, नंदुरबार व इतर ठिकाणी गुन्हे दाखल आहेत.
सदरची कारवाई- पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील, पोलीस अधीक्षक, मनोज पाटील,अहमदनगर,
अप्पर पोलीस अधीक्षक, सौरभकुमार अग्रवाल अहमदनगर,उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव,कर्जत यांचे मार्गदर्शनाखालीकर्जत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सपोनि सतीश गावित, सुरेश माने, पोलीस जवान शाम जाधव, जालिंदर पाचपुते, सुनील खैरे, गोवर्धन कदम, जयश्री गायकवाड आणि राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील, सपोनि प्रमोद पोरे, उपनिरीक्षक लोणकर व राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस जवान नाना मदने, योगेश राजवडे, महेश खरात, सोमा जाधव, भोर यांनी केली.