पिंपरी चिंचवड, दि.०२:- आकुर्डी येथे स्वरूप या वाईन्स शॉपमध्ये येऊन एकाने मी आकुर्डीचा भाई आहे. तुम्ही मला हप्ता म्हणून दारू द्या, असे म्हणत खंडणी मागितली. त्यानंतर दुकानदाराला शिवीगाळ दमदाटी करत दुकानातून बरदस्तीने ३२० रु . किंमतीच्या दोन मॅकडॉल नं . १ व्हिस्की कंपनीच्या १८० मि.ली. च्या दोन दारूच्या बाटल्या जबरदस्तीने नेल्या.ही घटना सोमवारी (दि. 1) सकाळी अकरा वाजताच्या सुमारास जुना पुणे मुंबई महामार्ग, आकुर्डी येथे स्वरूप वाईन्स या दुकानात घडली.
विजय वाघमारे (रा. आकुर्डी) असे गुन्हा दाखल झालेल्या स्वयंघोषित भाईचे नाव आहे. या प्रकरणी आदिनाथ हनुमंत गोरे (वय 25, रा. तळवडे) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे आकुर्डी येथे स्वरूप वाइन्स नावाचे दुकान आहे. सोमवारी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास आरोपी विजय वाघमारे फिर्यादी यांच्या दुकानात आला. मी आकुर्डी चा भाई आहे. तुम्ही मला हप्ता म्हणून दारू द्या, असे म्हणून दुकानातील दोन दारुच्या क्वार्टर्स आरोपीने घेतल्या.फिर्यादी यांनी आरोपीला विरोध केला असता त्याने जीवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान दुकानातील कामगार हा वाद सोडवण्यासाठी आले असता त्यांनाही आरोपीने शिवीगाळ व दमदाटी केली. त्यानंतर जबरदस्तीने 320 रुपये किमतीच्या दोन विस्की कंपनीच्या दारूच्या बाटल्या आरोपी घेऊन गेला. पुढील तपास उप नि शेळके मोनं करीत आहेत.