पुणे,दि०७ :-पुणे शहरातील वारजे-माळवाडी परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभागाने गोवा राज्य विक्रीचा परवाना दारू वर छापेमारी करत 52 लाखांचे विदेशी दारू जप्त केले आहे.या परिसरातून विदेशी दारू ची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यातनंतर एका आयशर वाहनावर छापेमारी करत ही कारवाई करण्यात आली. कारवाई दरम्यान कृष्णा तुळशीराम कांदे (30 मु.आंबील वडगाव पो.पाथेरा, ता.बीड) याला अटक करण्यात आली आहे. या मोठ्या कारवाईनंतर पुणे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
उत्पादन शुल्क विभागाला गोवा राज्य विक्रीचा परवाना असलेलया मद्याची वाहतूक होणार असल्याची टीप मिळाली होती. त्यानुसार उत्पादन शुल्क विभागाने आयशर (एमएच 09, एफएल 2948) या गाडीवर छापा टाकला. त्यातून वेगवगेळ्या विदेशी मद्याचे एकूण 450 बॉक्स व वाहतुकीसाठी वापरण्यात आलेलं वाहन जप्त करण्यात आलं आहे. यावेळी विभागाने एकूण 52 लाख 42 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही करावाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उपाम, विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे, पुण्याचे अधीक्षक संतोष झगडे, बीडचे अध्यक्ष नितीन घुले यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली.कोरोना नियमावलीमध्ये शिथिलता दिल्यानंतर मद्याची मागणी वाढतेय पुणे जिल्ह्यात यंदाच्या पहिल्या दहा महिन्यात 19 टक्क्यांनी मद्याची मागणी वाढली आहे. ही मागणी गतवर्षीच्या पहिल्या 10 महिन्यांच्या तुलनेत अधिक असल्याचा निर्वाळा उत्पादन शुल्क विभागाने दिला आहे. तर बिअरच्या विक्रीत 18 टक्क्यांनी वाढ झाली आहे. जिल्ह्यात आयएमएफएल (भारतीय बनावटीची विदेशी मद्य) आणि वाईनला चांगली मागणी आहे. 2020-21 मध्ये सरासरी आयएफएमएलची विक्री 12,588,617लीटर (एप्रिल ते सप्टेंबर) वाइनचा वापर आणि खरेदी देखील वाढली आहे. जिथे 2020-21 मध्ये ते सुमारे 500,992 लिटर होते. अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संतोष झगडे यांनी दिली आहे.