पुणे, दि०९:- पुणे महापालिका सह ईतर ठिकाणचे निवडणूक २०२२ चे प्रभाग रचना व आरक्षण सोडत डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात जाहीर तर १५ जानेवारीपर्यंत निवडणुकीची घोषणा होईल.तर निवडणूका फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अथवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होतील, अशी माहिती वरिष्ठ अधिकार्यांनी दिली.
पुणे महानगरपालिका, व पिंपरी चिंचवडसह राज्यातील १० महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या दृष्टीने राज्य निवडणूक आयोगाने ३० नोव्हेंबरपर्यंत प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेश या महापालिकांना दिले आहेत. त्यादृष्टीने महापालिकेने कच्चा आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. निवडणूक आयोगाकडून डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात हरकती व सूचनांसाठी प्रभाग रचनेचा आराखडा जाहीर करणे तसेच आरक्षण सोडत काढण्यासाठी आदेश मिळण्याची शक्यता आहे. हरकती व सूचनांवर सुनावणी झाल्यानंतर जानेवारीच्या मध्यावर निवडणूक कार्यक्रम घोषित होईल. मतदान साधारण फेब्रुवारीच्या शेवटच्या अथवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होईल, अशी माहिती वरिष्ठ अधिकार्यांनी दिली. मार्चच्या पहिल्या आठवड्यात मतदान न झाल्यास दहावी व बारावीच्या वार्षिक परीक्षांमुळे पुढे जाण्याची भितीही या अधिकार्याने व्यक्त केली आहे.
२०२२ पुणे महापालिकेचे असे असेल चित्र
२०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या – ३५ लाख ५६ हजार ८२४.
एकूण सदस्य संख्या – १७३
महिला सदस्य संख्या – ८७
तीन सदस्यीय प्रभाग संख्या – ५७
द्विसदस्यीय प्रभाग संख्या – १
तीन सदस्यीय प्रभागातील मतदार संख्या. – सरासरी ६१ हजार ५८०. कमाल ६७ हजार ८४८. किमान ५५ हजार ५१२
द्विसदस्यीय प्रभागातील मतदार संख्या – सरासरी ६१ हजार ५८०. कमाल ४५ हजार २३२. किमान ३७ हजार ८.
अनुसूचित जातीची लोकसंख्या – ४ लाख ८० हजार १७. (सदस्य संख्या २३)
अनुसूचित जमातीची लोकसंख्या – ४१ हजार ५६१ (सदस्य संख्या २)
नागरिकांच्या मागासवर्गासाठी राखून ठेवायच्या जागा – ४७ सदस्य.