• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • निधन वार्ता
Thursday, March 30, 2023
  • Login
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • निधन वार्ता
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • निधन वार्ता
No Result
View All Result
झुंजार
No Result
View All Result
Home ठळक बातम्या

एसटी कामगारांनी 24 तासांच्या आत कामावर हजर व्हा ; अन्यथा सेवा समाप्त , एसटी महामंडळाची कर्मचाऱ्यांना नोटीस

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
17/11/2021
in ठळक बातम्या, राज्य
Reading Time: 1 min read
0
एसटी कामगारांनी 24 तासांच्या आत कामावर हजर व्हा ; अन्यथा सेवा समाप्त , एसटी महामंडळाची कर्मचाऱ्यांना नोटीस
0
SHARES
223
VIEWS

पुणे,दि१७:- एसटी महामंडळाने रोजंदारीवर काम करणाऱ्या 300 ते 350 कामगारांना सेवा समाप्तीची कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.या कामगारांनी 24 तासांच्या आत नोकरीवर हजर व्हावे अन्यथा कोणतीही पूर्वसूचना न देता आपली तात्पुरत्या स्वरूपाची नेमणूक रद्द करण्यात येईल असे या नोटिसीत म्हटले आहे.
मंगळवारी एसटी महामंडळाचे 7,623 कर्मचारी डय़ुटीवर हजर झाले असून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत 66 बसेस राज्याच्या विविध भागांत सोडण्यात आल्या आणि त्यातून 1852 प्रवाशांनी प्रवास केला.एसटी महामंडळात रोजंदारी स्वरूपातील दिवस भरला तर पगार, अशा तात्पुरत्या स्वरूपाच्या नेमणूकीचे सुमारे दोन हजार कामगार आहेत. त्यांना महामंडळाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.महामंडळाने आतापर्यंत एकूण 2,178 कर्मचाऱयांना निलंबित केले आहे.महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतन श्रेणी एस.टी. कर्मचारी संघटनेचे नेते अजयकुमार गुजर यांनी उच्चस्तरीय समितीसमोर आपल्या संघटनेची बाजू आज मांडली.राज्याच्या मुख्य सचिवांनी घेतलेल्या या बैठकीतही संपाबाबत तोडगा निघाला नाही.28 युनियन आहेत , कुणाशी बोलायचं ?
‘एसटी कामगारांच्या 28 युनियन आहेत. त्या युनियनचे प्रतिनिधी सरकारला भेटून चर्चा करतात. त्यांच्या अनेक मागण्या मार्गीही लावल्या. मात्र ते पुन्हा चर्चेसाठी येत नाहीत. लाखो कामगार आहेत. त्या प्रत्येकाशी चर्चा शक्य नाही. युनियनचे कोण कोणाला ऐकायला तयार नाही. अशा परिस्थितीत कोणाशी बोलायचे ते सांगा,’ असा सवाल परिवहनमंत्री अनिल परब यांनी एसटी कामगारांना केला आहे. एसटी कामगारांच्या संपाबाबत पत्रकारांशी बोलताना अनिल परब म्हणाले, एसटी कामगारांचा संप 15 दिवसांनंतरही सुरूच आहे. उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीनुसार आज कामगारांचे प्रतिनिधी मुख्य सचिवांच्या समितीसमोर आपले म्हणणे मांडले. याबाबत अभ्यास करून समिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अहवाल सादर करेल. त्यानुसार एसटी महामंडळाच्या विलीनीकरणाचा पुढील निर्णय घेतला जाईल. याव्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर सरकारची दारे चर्चेसाठी खुली आहेत.कोणी पुढे येऊन हमी घेत असेल तर त्याच्याशीही बोलण्याची तयारी एसटी कामगारांच्या सर्व प्रतिनिधींची कृती समिती तयार झाली होती. त्यातील प्रत्येकाशी चर्चा केली. काही प्रश्न सोडवले. 28 युनियनच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. त्यानंतरही त्यांना मान्य नसेल तर कामगारांनी आपले प्रतिनिधी नेमून द्यावेत. जे कोणी कामगार बोलायला येतात ते चर्चा करतात, जातात आणि परत येत नाहीत. 28 संघटनांच्या युनियनलाही कामगार मानायला तयार नाहीत. त्यामुळे कोणी पुढं येऊन हमी घेत असेल तर माझी कोणाशीही बोलायची तयारी आहे,’ असंही परब यांनी स्पष्ट केलं.पडळकर , सदाभाऊ खोत म्हणाले , कामगारांशी बोलून कळवतो !सध्या कामगारांचं नेतृत्व करणारे गोपीचंद पडळकर व सदाभाऊ खोत यांच्याशी मी दोन वेळा चर्चा केली. सरकारचा दोन्ही वेळचा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवला. कामगारांशी चर्चा करून तुम्हाला कळवतो असे सांगून ते गेले, पण पुढं काहीच झालेलं नाही. कदाचित कामगार त्यांचेही ऐकत नसावेत किंवा ते कामगारांना समजावण्यात कमी पडत असतील,’ असे अनिल परब म्हणाले.रोजंदारी कर्मचाऱयांना इशारा एसटीमध्ये सध्याच्या घडीला 1200 ते 1500 रोजंदारी कामगार आहेत. या कामगारांनी कामावर यायला हवं अशी आमची अपेक्षा आहे, पण तेही संपात सहभागी झाले आहेत. त्यामुळे आम्ही त्यांना नोटीस पाठवणार आहोत. उद्या ते कामावर येतात की नाही पाहिले जाईल. अन्यथा, पुढे काय कारवाई करायची तो निर्णय घेतला जाईल, असे अनिल परब म्हणाले.

Share this:

  • Twitter
  • Facebook

Like this:

Like Loading...
Previous Post

माझी वसुंधरा अभियानाच्या यशस्वीतेसाठी लोकसहभाग वाढवा- विभागीय आयुक्त सौरभ राव

Next Post

पुण्यात रिक्षा प्रवास तीन रुपयांनी महागला ; 22 नोव्हेंबरपासून नवे दर

Next Post
पुण्यात रिक्षा प्रवास तीन रुपयांनी महागला ; 22 नोव्हेंबरपासून नवे दर

पुण्यात रिक्षा प्रवास तीन रुपयांनी महागला ; 22 नोव्हेंबरपासून नवे दर

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • निधन वार्ता
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • निधन वार्ता

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

WhatsApp us

%d bloggers like this: