पुणे,दि.22 :- सातारा येथे राहणाऱया सराईत वाहन चोराकडून बंडगार्डन पोलीस स्टेशनच्या पथकाने अटक करून त्याच्याकडून तब्बल 13 मोटार सायकली जप्त केल्या आहेत. फिर्यादी हे ऑगष्ट २०२१ मध्ये त्यांचे नातेवाईक ससुन रुग्णालय पुणे येथे उपचार घेत असल्याने ससुन हॉस्पीटल येथे नातेवाईकांना भेटण्यासाठी गेले होते. व त्यांनी ससुन हॉस्पीटल आवारात पार्क केलेली मोटार सायकल कोणीतरी चोरी केल्याची खात्री झाल्याने त्यांनी बंडगार्डन पोलीस स्टेशन येथे दिलेल्या तक्रारी वरुन अज्ञात इसमा विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे . ससुन हॉस्पीटल परिसरातुन या पूर्वी अनेक दुचाकी वाहने चोरी गेल्याच्या तक्रारी प्राप्त आहेत . त्या गुन्हयांचा तपास पोलीस उप निरीक्षक. राहुल पवार व तपास पथकाचे अंमलदार करीत होते. वाहन चोऱ्यांना आळा बसावा या करीता पोलीस उप आयुक्त , परि ०२ यांनी दिलेल्या सुचना नुसार ससुन परिसरातुन चोरीस गेलेल्या दुचाकी वाहनांचा तपास चालु असताना पोलीस उप निरीक्षक राहुल पवार व तपास पथक यांनी बंडगार्डन पोलीस स्टेशन या गुन्हयातील चोरीस गेलेल्या मोटार सायकलची चोरी करतानाचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त केले होते . त्या आधारे २०० हुन अधिक खाजगी व सरकारी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करुन नमुद वाहन चोरी करणारा आरोपी हा सातारा जिल्हयातील असल्याची खात्रीशीर माहिती प्राप्त झाली . त्या नुसार तपास पथकाचे अंमलदार सुधीर घोटकुले व सागर घोरपडे यांनी गोपनीय बातमीदाराकडुन माहिती प्राप्त केली असता वाहन चोरी करणारा अख्तर चांद मुजावर ,वय वर्षे 44, रा . मुपो बनवडी ता. कोरेगाव , जि सातारा हाच असल्याची खात्री करुन त्याचा शोध घेऊन त्यास दि २० रोजी अटक करुन त्याचेकडे अधिक तपास केला असता त्याने स्वतःचे आर्थिक लाभासाठी ससुन हॉस्पीटल परिसरातील ०६. पुणे शहरातुन हडपसर , निगडी , स्वारगेट परिसर तसेच सातारा शहर अशा वेगवेळ्या ठिकाणावरुन एकूण १३ दुचाकी वाहने चोरी केल्याचे तपासात माहिती पोलिसांना सांगितली आहे . आरोपीकडे सखोल तपास करुन एकुण १३ दाखल गुन्ह्यातील नमुद १३ दुचाकी वाहने हस्तगत करण्यात आली आहेत . सदर कारवाई अप्पर पोलीस आयुक्त , पश्चिम विभाग डहाळे , सागर पाटील , पोलीस उप आयुक्त , परिमंडळ ०२ चंद्रकांत सांगळे , सपोआ लष्कर विभाग , पुणे यशवंत गवारी , वरिष्ठ पोलीस निरीक्षक , श्रीमती अश्विनी सातपुते पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) बंडगार्डन पोलीस स्टेशन पुणे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रभारी अधिकारी. राहुल पवार , तसेच तपास पथकाचे सहा पोउपनि मोहन काळे व पोलीस अंमलदार फिरोज शेख , हरिष मोरे , प्रताप गायकवाड , सुधीर घोटकुले , अनिल कुसाळकर , संजय वणवे , सागर घोरपडे व किरण तळेकर यांनी केली आहे .