आजची पहाट दोन वर्षापूर्वीची 23 नोव्हेंबर, 2019 ची पहाट उगवली ती राजकीय एक धक्कादायक माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी सोहळ आजही चर्चेचा विषय आहे.या शपथविधीला आज दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. 23 नोव्हेंबर 2019 रोजी पहाटे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली तर अजित पवार यांना उप मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. मुंबई येथील राज भवनात हा शपथविधी पार पडला होता. राष्ट्रवादी आणि भाजप यांच्या युतीने देशभरात खळबळ माजवली होती. अडीच दिवस टिकलेल्या या सरकारची सर्वत्र चर्चा झाली. अल्पवधीतीच सरकार कोसळलं अन् यामुळे देवेंद्र फडणवीस यांना टीकेचा सामना करावा लागला.
23 नोव्हेंबर 2019 रोजी राज्यात मोठा राजकीय भूकंप घडला होता. शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचं सरकार स्थापन करण्यापूर्वीच देवेंद्र फडणवीस यांनी विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांना हाताशी धरुन पहाटेच शपथविधी कार्यक्रम केला होता. राज भवनामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. पण फक्त अडीच दिवसात हे सरकार कोसळलं. शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदाराचे बंड मोडून काढले होते. त्यामुळे अजित पवार यांच्या पाठीशी असणारी ताकद कमी झाली अन् पहाटेचा शपथविधी पार पडलेलं सरकार अल्पमतात आलं. त्यामुळे अखेर फडणवीस यांना राजीनामा द्यावा लागला. या घटनेनंतर फडणवीस यांना टीकेचा सामना करावा लागला होता.नेमकं काय झाले होते?
23 नोव्हेंबर, 2019 ची पहाट उगवली ती एक धक्कादायक राजकीय बातमी घेऊन. भाजपचे देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिल्याची त्या बातमीने राजकीय वर्तुळात हल्ला माजला. पण ही खेळी नंतर फसलीच. आज त्या फसलेल्या शपथविधीला आज दोन वर्ष झाली. प्रचारादरम्यान मी पुन्हा येणार…अशी गर्जना देवेंद्र फडणवीसांनी घेषणा केली होती. आपणच मुख्यमंत्री होणार, याबाबत फडणवीसांना अपेक्षा होती. राज्यात दीडशे जागा मिळणार असे भाजप नेते सांगत होते. पण त्यांना 105 जागा मिळाल्या. बहुमतासाठी 145 आमदारांची आवश्यकता होती. भाजपने 152 जागा लढल्या होत्या. सत्तेतले त्यांचे भागिदार शिवसेनेने 124 जागी उमेदवार दिले होते. तर एनडीएतल्या मित्र पक्षांनी 12 जागा लढवल्या होत्या. शिवसेनेचे 56 उमेदवार निवडून आले. शिवसेना आणि भाजप यांच्यात मुख्यमंत्रिपदासाठीची रस्सीखेच सुरु झाली. ठरल्याप्रमाणे अडीच-अडीच वर्षाचा मुख्यमंत्री होईल, असा दावा शिवसेनेनं केला. भाजपनं आम्हाला शब्द दिला होता, असा दावा शिवसेनेकडून करण्यात आला. पण आपण असा शब्दच दिला नव्हता, असं भाजपकडून सांगण्यात आलं. हे सर्व सुरु असताना शरद पवार यांच्या नेतृत्वात नव्या समिकरणाची निर्मिती झाली. शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस असं महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करण्यासाठी चाचपणी सुरु झाली. हे सर्व सुरु असतानाच देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना हाताशी धरुन पहाटे शपथविधी उरकला. पण हे सरकार फार काळ तग धरु शकलं नाही. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अजित पवार यांच्यासह त्यांच्यासोबत गेलेल्या काही आमदारांचं बंड मोडून काढलं आणि पवार यांनी शिवसेना आणि काँग्रेससोबत नवी मोट बांधली. देवेंद्र फडणवीस यांना अवघ्या 80 तासांत मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.